मराठा आरक्षण देण्याची राज्यसरकारची इच्छा नाही ; चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

अध्यादेश काढल्यानंतर याचिकाकर्ते पुन्हा न्यायालयात जातील. हे सरकार मराठा समाजाला उल्लू बनवत आहे.’’

कोल्हापूर : राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही. अध्यादेश काढणे हे स्थगितीला उत्तर असू शकत नाही. याचिकाकर्ते गप्प बसणार नाहीत ते न्यायालयात जातील. ते मराठा समाजाला उल्लू बनवत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते बोलत होते.

हेही वाचा - 7899 हाच नंबर ठरला ॲड. शिंदे यांच्यासाठी विजयाची निशाणी

 

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर राज्य सरकार गंभीर नव्हते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. सरकारला आरक्षण देण्याची इच्छाच नाही. या ‘महाभकास आघाडीला’ आरक्षण टिकवता आलेले नाही. न्यायालयाच्या स्थगितीला अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही. अध्यादेश काढल्यानंतर याचिकाकर्ते पुन्हा न्यायालयात जातील. हे सरकार मराठा समाजाला उल्लू बनवत आहे.’’

हेही वाचा - विना मास्क फिरणाऱ्यांना कोल्हापूर महानगरपालिकेचा दणका 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री घरात बसून राज्य चालवत आहेत. त्यांना प्रश्‍न विचारलेले आवडत नाहीत. त्यामुळे ते प्रश्‍न विचारणाऱ्या पत्रकारांना तुरुंगात टाकतात. उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना नेहमी सर्वांनी आपली स्तुती करावीशी वाटते. मात्र आम्ही त्यांची स्तुती करणारे नाही.’’

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil criticizes on state government on maratha aarakshan in kolhapur