
ध्या कोल्हापूर हाच शुटींगसाठी सक्षम पर्याय असून अनेक मोठ्या प्रोजेक्टनी येथे शुटींगसाठी येण्याची तयारी दर्शवली आहे.
कोल्हापूर - राज्यातील ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये दक्षता घेवून व सर्व नियम पाळून शुटींग आणि निर्मितीनंतरची प्रक्रिया सुरू करता येईल, अशी ग्वाही आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आता येथील शुटींग लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकूणच मनोरंजन क्षेत्राची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूरने गेली महिनाभर प्रयत्न सुरू केले होते. सध्या कोल्हापूर हाच शुटींगसाठी सक्षम पर्याय असून अनेक मोठ्या प्रोजेक्टनी येथे शुटींगसाठी येण्याची तयारी दर्शवली आहे. या साऱ्या प्रक्रियेत कलाकार व तंत्रज्ञांच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला तर "सकाळ'ने या सर्व घटकांना झूम मीटिंग ऍपच्या माध्यमातून एकाच प्लॅटफॉर्मवर आणले आणि या साऱ्या प्रयत्नांना खमके पाठबळ देत कोल्हापुरात लवकरात लवकर शुटींग सुरू व्हावीत, अशी स्पष्ट भूमिका घेतली.
हे पण वाचा - बाप आहे की कसाई ; चौथीही मुलगीच झाल्याने उचलले हे धक्कादायक पाऊल
राज्यातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाटक, मालिकांचे निर्माते, कलाकार यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. शुटींग करताना कंटेनमेंट झोन्समध्ये लोकेशन्स नाहीत ना तसेच लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे या गोष्टी देखील पाहाव्या लागतील. संपादन प्रक्रिया करणाऱ्या स्टुडीओमध्ये परवानगी द्यायची असेल तर तेथील जागा, वातानुकुलित यंत्रणा याबाबतही सुचना द्याव्या लागतील. पावसाळ्यापूर्वी अशी काही शुटींग शक्य होतील का ते पाहण्यास सांस्कृतिक कार्य विभाग व निर्मात्यांना त्यांनी यावेळी सांगितले.
हे पण वाचा - तो कर्नाटकातला, ती महाराष्ट्रातली, लग्न करुन त्यांनी संसार थाटला पण...
मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ संजय मुखर्जी आदी यावेळी उपस्थित होते. या कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन सुबोध भावे, आदेश बांदेकर यांनी केले. खासदार डॉ अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, सुनील फडतरे, केदार शिंदे अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे आदींनी सूचना केल्या.