पोलिसांनी धरली राजू शेट्टींची काॅलर; कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात गोंधळ

सुनील पाटील
Tuesday, 1 December 2020

कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर : दिल्लीतील शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चा वेळी पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाळताना पोलीस आणि कार्यकर्त्यांची जोरदार झटापट झाली.खासदार राजू शेट्टी यांच्या  कॉलरला पोलिसांनी हात घातल्यामुळे कार्यकर्ते  पोलिसांच्या विरोधात खवळून उठले. 

 

मोदी सरकार हे अदानी आणि अंबानी यांचे हस्तक आहेत हे सरकार त्यांच्यासाठीच काम करत आहेत शेतकऱ्यांचा बळी जात असताना सरकार मात्र त्यांच्यावर अन्याय करत आहे. दोन दिवसात सरकारने शेतकरी विधेयकाबाबत निर्णय न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला.

हेही वाचा- जयंत पाटील भाजपात येणार होते? चंद्रकांत पाटील यांचं सूचक उत्तर -

 दरम्यान  हे आंदोलन सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी चारचाकी वाहनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा आणला होता हा पुतळा पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी कार्यकर्त्यांकडून हा पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न केला यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांची जोरदार झटापट झाली पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची कॉलर धरून  बाहेर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यकर्ते जोरदार खवळे व पोलिसांच्या अंगावर धावून गेले यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion in the agitation of Swabhimani Shetkari Sanghatana kolhapur