हातकणंगले हादरले : आता प्रतिक्षा त्या 30 अहवालाची...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

हातकणंगले आणि परिसर हादरून गेला आहे. खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तो रहात असलेली इमारत सील केली आहे

हातकणंगले (कोल्हापूर) :  गेल्या काही वर्षापासून हातकणंगले येथे रहात असलेलया एका ३५ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल काल आल्यानंतर हातकणंगले आणि परिसर हादरून गेला आहे. खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तो रहात असलेली इमारत सील केली आहे.

त्याची पत्नी , मुलांसहीत तो कोरोचीतील ज्या युवकांसोबत कारमधून आला त्यांना विलगीकरण कक्षांत ठेवले असून त्याच्याशी संबंधित ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान पूर्ण गाव आजपासून पाच दिवसांसाठी लॉक डाऊन जाहिर करण्यांत आले आहे.  संबंधित कामगार गेले काही महिने   बुरहानपूर( म. प्रदेश ) येथे कामाला आहे. तो कोरोचीतील एका युवकांसह गेल्या आठवडयांत कारने हातकणंगलेत आला आहे.

हेही वाचा- अबब -  एका मिरचीच्या झाडाला लागल्या 8 किलो मिरच्या.....

२० ता. ला त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. काल त्याचा अहवाल पॉाझिटीव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. तो रहात असलेली इमारत सील करण्यांत आली आहे. त्या इमारतीपासून अर्ध्या कि.मी. चा परिसर कन्टेंनमेंट झोन म्हणून जाहिर केला असून चारी बाजूंनी सील केला आहे. तर तीन कि.मी. चा परिसर बफर झोन म्हणून जाहिर केला असून यातील सर्वाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. दरम्यान ठाणे येथून भादोले येथे आलेल्या  व पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या ३२ वर्षीय महिलेलाही सीपीआरमध्ये पाठवण्यांत आले आहे. भादोले गावांतही लॉक डाऊन जाहिर केले आहे तर त्या महिलेशी संबंधित ४० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे सर्वांचे या स्वॅबच्याअहवालाकडे लक्ष लागले आहे....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona affect on hatkanangale villege waiting 30 swab report