प्रभू रामाच्या मंदिराला सुद्धा असा टाळा...

corona effect on ramtirth Famous pilgrimages in aajra
corona effect on ramtirth Famous pilgrimages in aajra

रामतीर्थ हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. कोकण सीमेवरील हे ठिकाण धार्मिक आणि नैसर्गिक दृष्ट्या पर्यटनाचे ठिकाण आहे. येथे भाविक आणि पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉक डाऊनची घोषणा केली आणि इथल्या मंदिरांना कुलपे लागली. संचारबंदीमुळे सद्या हा परीसर निर्मनुष्य आहे. शांत वातावरणात झुळझुळ वाहणारा वारा आणि पशु पक्षांचा आवाज भरून राहिला आहे.प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने हे ठिकाण पुनीत झाल्याचे मानले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. त्याशिवाय वर्षभर भाविक आणि पर्यटकांचा राबता असतो. सध्या मात्र इथले सर्वच देऊ कुलूपबंद झाले आहेत. प्रभू रामाच्या मंदिराला सुद्धा असा टाळा लावल्याचे आपण पाहू शकतो.

हिरण्यकेशी नदीच्या तीरावर डोंगराच्या कुशीत वसलेला हा परिसर मनाला आनंद देतो. घनदाट वृक्षराजी, विविध पशुपक्ष्यांचे आवाज यामुळे मन भारावून जाते. देवस्थानाबरोबरच इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण आहे ते म्हणजे धबधबा. पावसाळ्यात हिरण्यकेशी नदी प्रवाही झाल्यानंतर पुढचे सुमारे सहा सात महिने धबधबा कोसळत राहतो. विशेषत: महापुराच्या काळात धबधब्याच्या रूपाने नदीचे रौद्ररूप पाहण्यासारखे असते.

हिरण्यकेशी, चित्री, ताम्रपर्णी आणि घटप्रभा मिळून घटप्रभेचे खोरे मानले जाते. या सर्व नद्या कर्नाटकात जाई पर्यंत एकमेकात मिसळून पुढे घटप्रभा म्हणून वाहू लागतात. घटप्रभा नदीवरील गोकाक येथील धबधबा आणि रामतीर्थ धबधबा यात साम्य आहे. या दोन्ही ठिकाणचा कातळ सुद्धा तसाच वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com