ब्रेकिंग - कोल्हापुरात राजकीय कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

जिल्‍ह्यात आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ९०४ झाली आहे. दिवसभरात तीन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या.

कोल्हापूर - शिरोळ तालुक्‍यातील नांदणी येथील कोरोनाग्रस्त वृद्धाचा आज मिरजेतील रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर कोरोनामुळे १३ मृत्यू झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात नवे १६ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यात इचलकरंजीतील एका राजकीय कुटुंबातील दोघांचा समावेश आहे.

जिल्‍ह्यात आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ९०४ झाली आहे. दिवसभरात तीन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यांची संख्या आता ७३२ झाली आहे. एकूण १६० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.  मध्‍यरात्री आलेल्या अहवालामध्ये शहरातील सातजणांचा समावेश आहे. त्यात राजोपाध्येनगरमधील एक, न्यू शाहूपुरी एक, राजारामपुरी दोन व अन्य तिघांचा समावेश आहे. इचलकरंजीचे दोन आणि पाटण (जि. सातारा) येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान, सकाळी आलेल्या अहवालात सहाजण बाधित होते. त्यात आजरा तालुक्‍यातील तिघांचा तर इचलकरंजीतील दोघांचा समावेश होता. दरम्यान,  कोरोनाबाधित १६० पैकी दहा जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. सहा शासकीय रुग्णालयांत झालेल्या आरोग्य तपासणीत ६३० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 

तालुकानिहाय कोरोनाग्रस्त असे

आजरा ८४, भुदरगड ७६, चंदगड ९५, गडहिंग्लज १०५, गगनबावडा ७, हातकणंगले १६, कागल ५८, करवीर २७, पन्हाळा २९, राधानगरी ६९, शाहूवाडी १८७, शिरोळ १०, इचलकरंजी ६३, कोल्हापूर शहर ५७, अन्य राज्य २०, अन्य जिल्हा- १.

शहरी भागात चिंता वाढली
दीड महिन्यापूर्वी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, तेव्हा मुंबईतील अनेक लोक कोल्हापूरला आले. यात शाहूवाडी, आजरा, चंदगड, भुदरगड, पन्हाळा या डोंगरी तालुक्‍यातील सर्वाधिक व्यक्ती होत्या. त्यातील अनेक जण पॉझिटिव्ह होते. ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या डोंगरी भागातील आजरा वगळता अन्य तालुक्‍यांतील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आली आहे. शहरी म्हणजे इचलकरंजी, कोल्हापूरमध्ये मात्र पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ असल्याने चिंता कायम आहे.

हे पण वाचा - बोलता, ऐकता येत नसतानाही मुर्तीत आणतो जीवंतपणा 
 

शहरात  आढळलेले रुग्ण
 न्यू शाहूपुरी     १
 राजारामपुरी    २
 राजोपाध्येनगर    १
 अन्य भागातील     ३
 इचलकरंजी     ५
 आजरा     ३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infection two member of political family in kolhapur district