कोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच ; 165 नव्या रुग्णांची भर

शिवाजी यादव
Saturday, 19 September 2020

ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी रात्री बारापासून या क्षणापर्यंत 165 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर 14 कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू झाले आहेत. तर जवळपास 178 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. गेल्या 24 तासात 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या 1202 झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 38 हजार 810 तर कोरोनामुक्तांची संख्या 26 हजार 334 झाली आहे. 

हेही वाचा - भय कोरोनाचे ;  शाळा बंद मात्र कलाशिक्षकाचे समुपदेशनाचे काम सुरुच

 

गेल्या महिन्याभरात बहुतांशी प्रमाणात कोल्हापूर शहर, भुदरगड, करवीर, हातकणंगले, शिरोळ या भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. यातही जवळपास 145 व्यक्ती गंभीर आहेत. त्यांच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या महिन्यात आजरा, चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा या डोंगरी तालुक्‍यातील कमी होत असलेली कोरोनाबाधितांची संख्या पून्हा वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात आणखी वरील भागात 100 बाधितांची भर पडल्याने चिंतेत वाढ झाली.

हेही वाचा - कला अभ्यासक्रमासाठी मुदतवाढ ;विद्यार्थ्यांनो या तारखेपर्यत ऑनलाईन अर्ज करा सादर 

 

ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. मात्र यात 90 टक्‍क्‍या पेक्षा अधिक व्यक्ती सौम्य व मध्यम लक्षणे असल्याने त्यांना अवती भोवतीच्या तालुका कोवीड सेंटर मध्ये उपचार होत आहेत. गंभीर अवस्थेतील मोजक्‍याच व्यक्ती गंभीर आहेत. त्यांना मात्र सीपीआरकडे पाठविले जात आहे असे असूनही सीपीआर मध्ये 448 बेड आहेत. यातील आज वीस बेड रिकामे झाले होते. त्यावर नवे बाधित उपचारासाठी दाखल झालेत. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients increased in kolhapur 165 new corona patients cases registered today