कला अभ्यासक्रमासाठी मुदतवाढ ;विद्यार्थ्यांनो 'या' तारखेपर्यत ऑनलाईन अर्ज करा सादर

Covid impact decision to direct the arts For art courses Extended to September 30th
Covid impact decision to direct the arts For art courses Extended to September 30th

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या कला संचालनालयातर्फे कलाशिक्षण अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार आजपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत होती. मात्र, आता विद्यार्थ्यांना तीस सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. 


दरम्यान, गेल्या काही वर्षात कमीत कमी खर्चातील आणि सर्वाधिक करियरच्या संधी असलेले अभ्यासक्रम म्हणून या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. 
प्रथम वर्ष पदविका, प्रमाणपत्र, मुलभूत अभ्यासक्रम, कलाशिक्षक प्रशिक्षण आर्ट मास्टर या अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी ज्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्‍यकता नाही. उर्वरित विद्यार्थ्यांना तीस सप्टेंबरपर्यंत www.doa.org.in या संकेतस्थळावर दिलेली माहिती वाचून अर्ज सादर करावेत, असे आवाहन संचालनालयाने केले आहे. 

 सुधारित प्रवेश प्रक्रिया अशी
मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका-प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांव्दारे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे. महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायांप्रती अपलोड करणे.---- 20 ते 30 सप्टेंबर 

 उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड याद्या प्रदर्शित करणे.--- पाच ऑक्‍टोंबर 

 सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास त्या सादर करणे.--- 6 ऑक्‍टोंबर 

 उमेदवारांसाठी अंतिम निवड यादी प्रसिध्द करणे.--- 8 ऑक्‍टोंबर 

 संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे.----9 ते 16 ऑक्‍टोंबर  

संपादन -  अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com