कोल्हापूरकरांनो काळजी घ्या, कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये

corona positive cases found in today kolhapur 47 patients active
corona positive cases found in today kolhapur 47 patients active

कोल्हापूर : जिल्हाभरात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली. एका दिवसात 47 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. यापैकी 31 नवे बाधित शहरातील आहेत तर ग्रामीण भागात नगन्य संख्येने बाधित आढळले आहेत. यातून जिल्हाभरात उपचार घेणाऱ्यांची संख्या 175 पर्यंत पोहचल्याने चिंतेत भर पडली आहे. प्रत्येक पातळीवर खबरदारी घेणे महत्वाचे असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत. 

मुंबई, पुणे, अमरावती, नागपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दहा दिवसात वाढत राहिली. कोल्हापूरातही कोरोनाबाधितांची संख्या अधून मधून वाढ होत आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा सर्तक झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात दिवसात कमीत कमी 4 ते जास्ती जास्त 20 नवे बाधित सापडत होते, त्यामुळे कोरोना नियंत्रणात असल्याचे चित्र होते असे असताना आज अचानकपणे कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट वाढली आहे. 

  • एकूण कोरोना बाधित - 50 हजार 253 
  • कोरोना मुक्त - 48 हजार 340 
  • कोरोना मृत्यू - 1 हजार 38 
  • उपचार घेणारे - 175  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com