ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाचा तिसरा रूग्ण सापडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

गेल्या नऊ दिवसापूर्वी शहरातील भक्तीपूजानगरमध्ये पुण्याहून आलेला नातेवाईक कोरोना पॉजेटीव्ह असल्याचे तपासणीत आढळले होते. त्यानंतर हा परिसर सील करून तेथे औषध फवारणी केली होती, तसेच संबधीत पॉजेटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली होती. त्यांच्या कुंटूंबातील व्यक्ती तपासणी केली होती. तेव्हा संबधीत व्यक्तीची बहिण पॉझीटीव्ह आढळल्याने या दोघांवरही खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कोल्हापूर - कोरोनाचे संकट आता शहरात आले आहे, पहिल्या दोन रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच आज कसबा बावड्यातील मराठा काॅलनीमधील 63 वर्षी महिलेचा कोरोना तपासणी स्वॅबचा अहवाल पॉजेटीव्ह आला आहे. त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ठ झाले. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना पॉजेटीव्ह रूग्णांची संख्या आता तीन झाली आहे.

हे पण वाचा -  अन् सत्ताधारी पक्षावरच आली आंदोलन करण्याची वेळ

गेल्या नऊ दिवसापूर्वी शहरातील भक्तीपूजानगरमध्ये पुण्याहून आलेला नातेवाईक कोरोना पॉजेटीव्ह असल्याचे तपासणीत आढळले होते. त्यानंतर हा परिसर सील करून तेथे औषध फवारणी केली होती, तसेच संबधीत पॉजेटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली होती. त्यांच्या कुंटूंबातील व्यक्ती तपासणी केली होती. तेव्हा संबधीत व्यक्तीची बहिण पॉझीटीव्ह आढळल्याने या दोघांवरही खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 
या घटनेनंतर वैद्यकीय यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे. अशातच कसबा बावड्यातील या महिलेला दोन दिवसापूर्वी रूग्णालयात दाखल केले होते. त्या साताऱ्यावरून प्रवास करून १५ दिवसा पूर्वी येथे आल्या होत्या. त्यांना ताप, घसा दुखी, खोकला अशी लक्षणे दिसत होती.  त्यांना सीपीआर मध्ये दाखल केले होते. तपासणी वेळी स्वॅब मिरजेच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. यात संबधीत महिला कोरोना पॉझेटीव्ह असल्याचा अहवाल आहे.

 हे पण वाचा -  सह्याद्रीच्या दर्‍या खोर्‍यात राहणार्‍यांना करावे लागते 3. कि.मी पायपीट.....

असा अहवाल प्राप्त होताच संबधीत महिलेवर उपचारासाठी खासगी रूग्णालयात स्वतंत्र सोय करण्यात येत आहे, त्यासाठी सीपीआरचे वैद्यकीय पथक येथे तैनात झाले असून त्यांना मेडीकल व्कांरटाईन केले आहे. अशी माहिती सीपीआरच्या वैद्यकीय सुत्रांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive cases suspected kolhapur