मौजे सांगाव येथील 'तो' युवक कोरोना पॉझिटिव्ह ; गावात उडाली खळबळ

Corona Positive found in Mauje Sangav in kagal
Corona Positive found in Mauje Sangav in kagal

कसबा सांगाव - मौजे सांगाव (ता. कागल) येथील एका युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कागल पूर्व भागात पहिल्यांदाच कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रतिबंधक समितीच्या वतीने पुढील सात दिवस गाव बंद ठेवण्यात येणार आहे.

सदरचा युवक कोल्हापूर येथील खासगी बँकेत नोकरी करतो. त्याच्या मित्राला भेटण्यासाठी सदर युवक शनिवारी ४ जुलै रोजी चंदगड येथे गेला होता. दरम्यान चंदगड येथील मित्रा चे वडील पॉझिटिव्ह आढळले. थेट संपर्कात आल्याच्या कारणावरून चंदगड येथील मित्राने या युवकास तपासणी करण्यास सांगितले होते. सुरवातीला याला कोणतेही लक्षणे दिसून आली नव्हती. मात्र कोल्हापूर येथील डी.वाय.पाटील रुग्णालयात मध्ये तपासणी करून घेतले असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

घरातील आई आणि वडिलांसह प्रथम आणि थेट संपर्कात आलेल्या बारा जणांना कागल येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अजूनही काही संपर्कात आलेल्यांच्या शोध प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. गावात प्रतिबंधात्मक औषध फवारणीचे काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला असून सात दिवस गाव पूर्णतः बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com