कोरोनाच्या तणावाखालील नागरिकांचे होणार समुपदेशन 

Counseling for Coronary Stress Citizens kolhapur marathi news
Counseling for Coronary Stress Citizens kolhapur marathi news

कोल्हापूर ः कोरोना आजाराचा प्रार्दुभाव वाढत आहे. यामध्ये अनेकांना मानसिक ताणतणावांनाही सामोरे जावे लागते. म्हणून शिवाजी विद्यापीठातर्फे लवकरच समुपदेशन हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 30 जणांची निवड करण्यात आली असून ते समुपदेशन करतील. अशी माहिती कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी दिली.

कोरोना विषाणूची साथ आणि त्या अनुषंगाने देशात उद्भवलेली अभूतपूर्व परिस्थिती यामुळे नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होण्याची शक्‍यता असून मानसिक व्याधीची सुरवात या कालावधीमध्ये होऊ शकते. त्याचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावरही होण्याची शक्‍यता असते. तथापि, अशा परिस्थितीत जर प्राथमिक टप्प्यावरच योग्य व शास्त्रशुद्ध समुपदेशन मिळाले, तर व्यक्तीची सकारात्मकता वाढून त्याचा मानसिक आजारापासून बचाव करता येऊ शकेल.

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या एम.एस.डब्ल्यू. अधिविभागाचे प्रा. अमोल मिणचेकर यांच्या समन्वयाने नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्याकरिता फोन-इन समुपदेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश, समुपदेशनाची व्यावसायिक मूल्ये आणि प्रतिबंधात्मक दक्षता घेऊन सदर समुपदेशन करण्यात येणार आहे. सदर उपक्रमात सहभागी शिक्षक, विद्यार्थी हे जिल्हा सदर हेल्पलाईन सकाळी ते सायंकाळी या कालावधीत कार्यान्वित राहील. या सर्व प्रणालीची माहिती हेल्पलाईन क्रमांकांसह विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून व समाजमाध्यमांतून उपलब्ध केली जाईल.

कोरोनामुळे उद्‌भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे नागरिक दडपणाखाली आहेत. अशा स्थितीत संवाद हा महत्त्वाचा उपाय आणि उपचार आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने आपल्या एमएसडब्ल्यू अधिविभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी महापूर स्थितीमध्ये अनेक नागरिक नैराश्‍यग्रस्त झाले होते. त्या वेळीही शिक्षक, विद्यार्थ्यांना संबंधित नागरिकांचे समुपदेशन करून त्यांचे मानसिक पुनर्वसन करण्यात मोलाची कामगिरी यशस्वीपणे बजावली होती. यावेळीही विद्यापीठ त्याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हेल्पलाईन सुरू करीत आहे. त्याचा नागरिकांना निश्‍चितपणे लाभ होईल. 
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com