नागाळा पार्कातील प्रकार : वृद्ध महिलेला चहा, दूध,आणि भाकरीतून गुंगीचे औषध घालून 66 लाखांला घातला गंडा

incidence for Nagala Park crime case in kolhapur
incidence for Nagala Park crime case in kolhapur

कोल्हापूर : वृद्ध महिलेला गुंगीचे औषध देऊन तिला उपचारासाठी दाखल करून घरातील 66 लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. हा प्रकार नागाळा पार्क येथे घडला. याप्रकरणी संशयित अनिल सुभाष म्हमाणे (रा. लक्ष्मीपुरी दलाल मार्केट परिसर) असे त्या संशयिताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती,

रेखा जगन्नाथ दाभोळे या पतीसोबत नागाळा पार्क येथील एका सोसायटीत राहतात. संशयित अनिल म्हमाणे या कुटुंबाशी संपर्कात आला. त्याने दाभोळे यांच्या पतींना गुरू मानले. त्याने चळवळी संदर्भातील तुमचे पुस्तक छपाई करूया असे सांगून त्यांच्या पतीचा विश्‍वास संपादन केला. तसा तो वेळोवेळी रात्री अपरात्री त्यांच्या घरात जाऊ लागला. त्याने नोटाबंदीमुळे पाठोपाठ पुढेही आणीबाणीचीही शक्‍यता आहे. यात लोकांच्या रक्कमा जप्त होऊ शकतात अशा भूलथापांनी दाभोळे दापंत्याना भिती दाखवली. या दांपत्याने विविध बॅंकात ठेवलेली रक्कम त्यांना काढण्यास भाग पाडली.

दांपत्याने काढलेली 66 लाखांची रक्कम एका पिशवीत ठेऊन ती पिशवी दापंत्याच्या समक्ष दाभोळे यांच्या घरातील बेडरुममधील बेडच्या खाली लपवून ठेवली. त्यानंतर तो दोनवेळेला दाभोळे यांच्या घरी गेला. एक वेळेला त्याने स्वतः चहा केला. त्यात रेखा दाभोळे यांच्या चहातून व दुसऱ्यावे ळेस दुध भाकरीतून गुंगीकारण पदार्थ घातले. त्यानंतर त्यांना औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या मुदतीत दाभोळे यांच्या घरात परस्पर जावून दाभोळे यांचे वयस्क व आजारी पतीची नजर चुकवून संबधित 66 लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास केली. हा प्रकार नागाळा पार्क येथे दाभोळे राहत असलेल्या घरात 19 जून ते 4 सप्टेंबर 2020 या मुदतीत घडला. अशी फिर्याद रेखा दाभोळे यांनी दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे. त्यानुसार संशयित अनिल म्हणामेवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहूल वाघमारे करीत आहेत. 

पैसे बुडविण्यासाठी तक्रार

जगन्नाथ दाभोळे यांच्याशी आपले चांगले संबध होते. त्यांची पत्नी आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालायत डॉक्‍टर मित्रांच्या मदतीने दाखल केले. दाभोळे यांची मुलगी अमेरिकेला असल्याने हॉस्पिटलचा प्राथमिक खर्च मला करण्यास सांगितला होता. ती रक्कम 2 लाख 33 हजार 503 इतकी झाली. ही रक्कम परत मागण्यासाठी मी त्यांना रितसर वकीलांमार्फत नोटीस पाठवली होती. हॉस्पिटलची सर्व मूळ बिले आपल्याजवळ आहेत. केवळ पैसे बुडविण्याच्या हेतूने माझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. मी गेली वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असून माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा गुन्हा दाखल करणे माझ्यावर अन्यायकारक आहे असा खुलासा अनिल म्हमाने यांनी फोन व व्हॉटस्‌च्या माध्यमातून दिला. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com