कोल्हापुरात दिवसात 1 हजार 319 व्यक्तींना कोविशिल्ड लसीकरण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

  पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्‍टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले

कोल्हापूर  - कोरोना प्रतिबंधक लसीकरण (कोविशिल्ड) लसीकरणाला सुरवात झाली असून आज एका दिवसात शहरात 1 हजार 319 लसीकरण करण्यात आले. यात शासकीय तसेच खासगी रूग्णालयात लसीकरण सुविधा सुरू आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी प्रतिसाद वाढत आहे. 

गेल्या दोन महिन्यापासून कोविशिल्ड लसीकरण सुरू झाले. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्‍टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्या लसीकरणाा 28 दिवसपूर्ण झाल्यानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. या सोबतच 45 ते 59 वर्षाच्या व्याधीग्रस्त (कोमॉरबीड) व्यक्तीना लसीकरण सुरू केले. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना हे लसीकरण केले जात आहे. त्यानुसार महापालिकेच्या चार तर खासगी चार रूग्णालयात लसीकरण झाले. यात 60 वर्षा वरील व्यक्तींची ऑन दी स्पॉट नोंदणीकरून हे लसीकरण करण्यात आले. 

45 ते 59 वयोगटातील व्यक्ती ः 131 
60 वर्षावरील व्यक्ती ः 550 

 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covishield vaccination to 1 thousand 319 persons per day in Kolhapur