
उतूर (कोल्हापूर) - उडी मारणे हे काही त्याला नवीन नव्हते. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत फिरणे त्यांचे नित्याचेच होते. अशीच लांब उडी त्याने आज मारली मात्र त्याचा अंदाज चुकला आणि ही उडी त्याच्या जिवावर बेतली. मृत्यू नंतर केवळ एक प्राणी नाही तर जीव म्हणून त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार झाले.
हा प्रसंग आहे. उतूर (ता.आजरा ) येथील एका माकडाच्या जिवनातला. अन्न पाण्याची झळ वन्यप्राण्यांना ही बसत आहे. जंगलातील अन्नाचे स्रोत्र कमी पडल्याने वन्यप्राणी मानवी वस्त्याकडे धाव घेत आहे. आज सकाळी अन्नाच्या शोधात माकडाची एक टोळी उतूर येथील जैन गल्लीत दाखल झाली. दोन माद्या त्याना बिलगलेली दोन लहान पिल्ली, आणि एक नर असा पाचजनांचा हा कळप होता. नर वाट दाखवत पुढे चालला होता.घराच्या छपरावरुन उड्या मारणे सुरु होते. नराने या घरावरुन त्या घरावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. वाटेत विजेच्या तारा आडव्या होत्या. त्याचा अंदाज चुकला.तो खांबाला धडकला आणि विजेच्या तारामध्ये अडकला. शाॅक लागून तो गतप्राण झाला. पाठी मागून येणा-या कळपाच्या हा प्रकार लक्षात आला. तो जागच्या जागी थबकला माकिडीनी आवाज करायल्या लागल्या कावळ्यानाही याची चाहूल लागली ते ओरडायला लागले. त्यांच्या आवाजाने गल्लीतील नागरीक जमा झाले. माणसांची चाहूल लागताच कळप माघारी फिरला.
नागरिकांनी विज वितरणला माहिती दिली.वायरमन चंद्रशेखर दांडेकर व शांताराम भिऊंगडे यानी माकडाचा अडकलेला मृतदेह खाली काढला. जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांना ही घटना समजली.त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. ग्रामपंचायतीची गाडी मागवून तो मृतदेह त्यामध्ये ठेवला. स्मशानशेड च्या परिसरात खड्डा खणन्यात आला. आपटे यानी स्वतः तो मृतदेह उचलून खड्यात दफन केला. आजपर्यंत बेवारस माणसावर अनेकानी अंत्यसंस्कार केलेचे ऐकले होते. मात्र एका मुक्या प्राण्यावर लोकप्रतीनिधीने केलेले अंत्यसंस्कार माणूसकीचे दर्शन घडवणारे होते...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.