तक्रार मागे न घेतल्यास जीवे मारण्याची दिली धमकी ; २५ लाखांच्या खंडणीचीही केली मागणी

crime case in kolhapur ichalkaranji 25 lakh Ransom police attested in kolhapur
crime case in kolhapur ichalkaranji 25 lakh Ransom police attested in kolhapur

इचलकरंजी (कोल्हापूर) : पोलिसांत चोरीबाबत दिलेली तक्रार मागे न घेतल्यास जिवे मारण्याची धमकी देवून 25 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सूत व्यापारी मनिष सत्यनारायण मानधना यांच्यासह सातजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

सुमारे साडेपाच महिन्यांपूर्वी हॉटेल ताराजवळ घडलेल्या या घटनेची तक्रार धुळाप्पा आप्पा पुजारी (वय 63, रा. बिरदेव मंदिरजवळ, चंदूर, ता. हातकणंगले) यांनी आज दिली आहे. पोलिसांनी मनिषसह त्याचा भाऊ योगेश सत्यनारायण मानधना, विकास गाताडे, विजय गलगले, चंद्रकांत खानाज, खानाज यांचा मुलगा व अशोक दायमा यांच्यावर विविध तीन कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार पुजारी यांनी यापूर्वी या संशयितांच्या विरोधात पोलिसांत चोरीबाबतची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी या संशयितांनी 3 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता तारा हॉटेल परिसरात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे संशयितांनी दोन दिवसांत 25 लाखांच्या खंडणीचीही मागणी केली. खंडणी न दिल्यास कुटुंबासह संपविण्याबरोबरच खोटी तक्रार देवून पोलीस केसमध्ये अडकविण्याची धमकी त्यांना दिली. त्यानंतर तेथून संशयीत निघून गेले.

तक्रारदार पुजारी यांची हृदयाची शस्त्रक्रीया झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांनी त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. या संदर्भात त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला. त्याची शहनिशा पोलीस उप अधिक्षक बी.बी. महामुनी यांनी केली. त्यांनी याबाबतचा अहवाल अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांना सादर केला. याबाबत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना दिले. त्यानुसार आज पुजारी यांची तक्रार घेवून मानधना यांच्यासह सातजणांवर खंडणीसह विविध तीन कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com