'त्या' वृद्धेला आणलेली रुग्णवाहिका सापडली ; चालक-मालकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

पोलिस आणि आरटीओ यांनी किणी टोल नाक्‍यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून रुग्णवाहिकेचा शोध घेतला. या प्रकरणी स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असे काम केल्याबद्दलचा गुन्हा नोंद झाला आहे.

कोल्हापूर - कसबा बावडा येथील कोरोनाची लागण झालेल्या महिलेला रुग्णवाहिकेतून आणणाऱ्या चालक-मालकावर आज शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. प्रादेशिक परिवहन विभागातील निरीक्षकांनी आज फिर्याद दिली.

पोलिस आणि आरटीओ यांनी किणी टोल नाक्‍यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून रुग्णवाहिकेचा शोध घेतला. या प्रकरणी स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असे काम केल्याबद्दलचा गुन्हा नोंद झाला आहे. मलकापुरातून आज रुग्णवाहिका ताब्यात घेतली आहे. मालक सचिन लाड व चालक मिलिंद रेळेकर अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. 

हे पण वाचा - जोतिबा पालखी सोहळ्याची परंपरा यंदा थांबली... पण तो डोंगरावर पोहोचलाच

पोलिसांनी सांगितले, 28 मार्च 2020 ला दुपारी तीनच्या सुमारास रुग्णवाहिका (एमएच 09 बीसी 6987) मधून जिल्ह्यात परवानगी न घेता अवैधरित्या सातारा ते कोल्हापूर प्रवासी वाहतूक सुरू असल्याची तक्रार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली होती. काल सहा एप्रिलला किणी टोल नाक्‍यावरील सीसीटीव्ही तपासले असता तीत 28 मार्चला दुपारी तीन वाजून चार मिनिटांनी रुग्णवाहिका कोल्हापुरात येत असल्याचे दिसले. याच रुग्णवाहिकेतून प्रवास केलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली. काल रात्रीच पोलिसांच्या मदतीने या रुग्णवाहिकेचा शोध सुरू केला असता ही रुग्णवाहिका दापोली (जि. रत्नागिरी) कडे जात असताना मलकापूरजवळ आढळून आली. पोलिसांची मदतीने या रुग्णवाहिकेसह चालकाला ताब्यात घेतले. चालक आणि मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

हे पण वाचा - नजर जाईल तिथपर्यंत मृत्यूचा खच ; खांदा द्यायलाही नव्हती माणसे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime filed against ambulance owner kolhapur corona virus