esakal | चोर सोडून संन्यासाला फाशी ; दुचाकीस्वारालाच बेदम मारहाण, हा काय प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

crime in kolhapur two wheeler driver disputes with people by mistake

सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौक परिसरात दुपारी तणाव निर्माण झाला होता. 

चोर सोडून संन्यासाला फाशी ; दुचाकीस्वारालाच बेदम मारहाण, हा काय प्रकार

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : मिनी बसची मोटारसायकलला किरकोळ धडक बसली. तशी अज्ञाताने बसच्या काचा फोडल्या. पण हे कृत्य मोटारसायकलस्वारानेच केले या गैरसमजातून त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौक परिसरात दुपारी तणाव निर्माण झाला होता. 

याबाबत घटनास्थळावरू मिळालेली माहिती, मिनीबस चालक आज दुपारी यादवनगर परिसरात प्रवाशांना सोडून सावित्रीबाई हॉस्पीटल चौकातून पुढे जात होती. दरम्यान पुढील एका मोटारसायकलस्वाराला बसची किरकोळ धडक बसली. त्यात मोटारसायकलची नंबर प्लेट तुटली. दरम्यान एका अज्ञाताने बसची दगडाने तोडफोड केली. तसे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांना हे कृत्य मोटारसायकलस्वाराने केल्याचा गैरसमज झाला. यातून त्यांनी त्याला मारहाण केली. तसा तणाव निर्माण झाला. त्यामुळे रहदारीने गजबलेल्या या चौकात वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

हेही वाचा - पुणे पदवीधर नंतर जयंतरावांचा चंद्रकांतदादांना आणखी एक धक्का -

संपादन - स्नेहल कदम