बाप रे! पहिला विवाह झाला असतानाही संपत्तीसाठी बनली चक्क मृत व्यक्तीची पत्नी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

शहरातील एक व्यवसायिककडे एक महिला महिला नोकरीस होती. तिचा यापूर्वीच विवाह झाला असून तिला दोन मुलेही आहेत.

कोल्हापूर - संपत्तीसाठी कधी कोण काय करेल सांगता येत नाही. कोल्हापुरातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संपत्ती हडप करण्यासाठी चक्क मृत व्यावसायिकाची पत्नी असल्याची कागदपत्रे तयार करून एका महिलेने संपत्ती हडप केली आहे. मृत व्यवसायिकाची आपण पत्नी असून दोन आपत्य असल्याबद्दलचे बनावट दस्ताऐवज तयार करून मिळकतीवर नावे नोंद केल्याप्रकरणी महिलेसह पाच जणांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शहरातील एक व्यवसायिककडे एक महिला महिला नोकरीस होती. तिचा यापूर्वीच विवाह झाला असून तिला दोन मुलेही आहेत. संबधित व्यवसायिकाचा 2003 मध्ये मृत्यू झाला. त्यांना भाऊ बिहणीशिवाय इतर थेट वारस नाहीत. तसेच त्यांनी मिळकतीबाबत कोणतेही मृत्यूपत्र अगर दस्त करून ठेवलेले नव्हते. असे असतानाही संबधित महिलेने आपणच व्यवसायिकाची पत्नी असून आमची दोन आपत्य आहेत. असे खोटे बनावट दस्त तयार करून आपणच त्यांची सरळ वारस असल्याचे भासवले. त्याआधारे व्यवसायिकांने स्वकष्टाने मिळवलेल्या शहर परिसरातील तीन मिळकतीवर आपली नावे नोंदवून फसवणूक केली. हा प्रकार 2003 ते 2021 अखेर घडला. अशी तक्रार व्यवसायिकांच्या नातेवाईकांनी दिली. त्यानुसार राजारामपुरी पोलिसात ठाण्यात पाच संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 

हे पण वाचा -  Video - काँग्रेस पक्ष रसातळाला का गेला? राजू शेट्टी यांनी सांगितले कारण

 

                      
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime register women kolhapur rajarampuri police station