शिवाजी विद्यापीठात 'सायबर सिक्‍युरिटी' कार्यशाळा

Cyber ​​Security at Shivaji University
Cyber ​​Security at Shivaji University

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाने येत्या शुक्रवारी (10 एप्रिल) सायबर सिक्‍युरीटीविषयक एकदिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, या कार्यशाळेची ऑनलाइन नोंदणी सुरू होताच पहिल्या तासाभरातच देशभरातून सुमारे 87 इतकी विक्रमी नावनोंदणी झाली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या सायबर सिक्‍युरिटी व डाटा सायन्सेस फॅकल्टी डेव्हलपमेंट केंद्राचे संचालक डॉ. आर. के. कामत यांनी दिली आहे. 

डॉ. आर. के. कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे नागरिकांना घरात बसून या विषाणूचा प्रतिकार करावा लागत आहे. वर्क फ्रॉम होम, मोबाईल रिचार्जपासून ते विविध बिल पेमेंटपर्यंत जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार ऑनलाईन करावे लागत आहेत. हे करताना सायबर व फिशिंग हल्ल्यांमध्येही वाढ झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. 

या संदर्भात जनजागृती व योग्य सुरक्षाविषयक दक्षता कशी घ्यावी, याची विस्तृत माहिती देण्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पंडित मदनमोहन मालवीय शिक्षक व शिक्षणविषयक राष्ट्रीय अभियानांतर्गत शिवाजी विद्यापीठात कार्यरत असलेल्या सायबर सिक्‍युरिटी व डाटा सायन्सेस फॅकल्टी डेव्हलपमेंट केंद्राच्या वतीने येत्या 10 एप्रिल रोजी सायबर सिक्‍युरिटीविषयक एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा होत आहे. कार्यशाळेत इन्ट्रोडक्‍शन टू सायबर सिक्‍युरिटी, सायबर ऍटॅक्‍स क्‍लासिफिकेशन आणि स्मार्टफोन अँड पेमेंट सिक्‍युरिटी या विषयांवर ख्यातनाम तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी http://sangnaksuraksha.com/ या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. कामत यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com