तयारी पावसाळ्याची ः पंचगंगेत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके

तयारी पावसाळ्याची ः  पंचगंगेत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके

कोल्हापूर  : गेल्यावर्षीच्या पूरस्थितीचा अनुभव समोर ठेवून यावर्षीचे पूरस्थितीचे नेटके नियोजन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पंचगंगा नदीमध्ये बचाव कार्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. 
पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे, बुडणाऱ्यांना लाईफ सेव्हर कसे पोचवावे किंवा स्वयंसेवकाने त्याचा कसा बचाव करावा, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार स्मिता भामरे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. 
गेल्यावर्षी पंचगंगेचे रौद्र रूप पाहिले. तरीही अचानक आलेल्या या आपत्तीला धाडसाने आणि जिद्दीने सामना केला. यावर्षी मात्र आतापासूनच सर्व तयारी केली जात आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी कसे पोचवावे, पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे आणि त्याला प्रथमोपचार कसे करावेत, याची सर्व माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर पंचगंगा नदीमध्ये रबरी बोटींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. बोटीतून पंचगंगा जुन्या पुलाजवळून ते पंचगंगा घाटापर्यंत सर्व बोटींची चाचणी घेण्यात आली. यावेळी प्रसाद संकपाळ म्हणाले, गेल्यावर्षीच्या पुराचा अनुभव पाहता यावर्षी आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे. 

अशी घेणार दक्षता... 
पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या पुढाकाराने आतापासून आपत्ती व्यवस्थापन केले जात आहे. गेल्यावर्षी जे लोक बाधित क्षेत्रात होते, त्यांना आधीच सूचना देऊन कळवले जाणार आहे. त्याबाबत सर्व पातळीवर माहिती संकलन केली जात आहे. दरम्यान, नव्याने सुमारे 20 बोटी तसेच इतर साहित्य खरेदी केले जाणार आहे. पुराच्या ठिकाणी प्रत्येक गावपातळीवर एक बोट ठेवण्याचेही नियोजन सुरू आहे. यावर योग्य निर्णयही घेतला जाणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com