सावधान : कोल्हापुरात आढळल्या ८३ ठिकाणी अळ्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

टेमीफॉस हे द्रावण टाकून नष्ट करण्यात आल्या.

कोल्हापूर : महापालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरू केलेल्या डेंगी प्रतिबंधात्मक मोहिमेत आज ९ प्रभागांतील १२७१ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २०७५ कंटेनर तपासले. त्यामध्ये ८३ ठिकाणी डेंगी आढळल्या असून, त्या टेमीफॉस हे द्रावण टाकून नष्ट करण्यात आल्या.

शहरातील प्रभाग क्र. १६, १९, २५, ३, ३७, ४५, ६१, ७१  व  ७८ या  ९ प्रभागात डेंगी प्रतिबंधात्मक मोहिमेत राबविली. १२७१ घरांची तपासणी केली असता घरातील कंटेनर यामध्ये फ्रीज, बॅरेल, सिंटेक्‍स टाक्‍या, कुंड्या, टायर आदी २०७५ बाबींची तपासणी केली. यामध्ये ८३ ठिकाणी डेंगीच्या अळ्या आढळून आल्या. त्या औषध टाकून नष्ट करण्यात आल्या. तसेच औषध व धूर फवारणीवरही भर दिला आहे.

हेही वाचा- PHOTO : कोल्हापुरच्या अवलियाने फोटोग्राफीतून उलगडले पक्षांचे विश्व -

यापुढेही ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार आहे. डेंगी प्रतिबंधात्मक मोहिमेत डास अळी सर्वेक्षण औषध फवारणी व धूर फवारणी, तसेच टायर जप्ती मोहीम व शौचालयाच्या वेंट पाइपला जाळी बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे व टायर्स नारळाच्या करवंट्या, फुटके डबे जेणेकरून पाणी साठणार नाही, अशा वस्तूंचा त्वरित नायनाट करून डेंगी, चिकुनगुण्या नियंत्रित ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dengue prevention campaign kolhapur