दिशाभूल थांबवा, घरफाळा कधी भरणार ते सांगा; धनंजय महाडिक

dhanjay mahadik critisize on satej patil political marathi news
dhanjay mahadik critisize on satej patil political marathi news

कोल्हापूर : डी.वाय.पी सिटी मॉलमधील भाडयाने दिलेल्या मिळकती स्वतःच्या वापरात दाखवून पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा घरफाळा बुडवला आहे. हा जुना विषय असल्याचे ते सांगत आहेत. पण 2014 ते 2021 या कालावधीतील सुमारे पंधरा कोटी रुपयांचा घरफाळा कधी भरणार, हे जाहीर करून त्यांनी जुना विषय संपवावा. नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभूल करू नये. थकीत घरफाळा कधी भरणार हे आधी पालकमंत्र्यांनी स्पष्ट करणे आवश्‍यक असल्याचे पत्रक माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धिस दिले आहे. 

महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे की, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांचे कार्यकर्ते पत्रकार परिषद घेवून धादांत खोटे बोलत आहेत. आता तर महापालिका प्रशासनावर खापर फोडून स्वतःचा बचाव करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

वास्तविक 24 ऑक्‍टोबर 2014 रोजी महानगरपालिकेने डी वाय पाटील हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्र लिहून माहिती सादर करण्याबाबत कळवले होते. त्यानंतर 18 ऑक्‍टोबर 2019 ला संजय ज्ञानदेव पाटील यांना महानगरपालिकेने पत्र पाठवून मिळकतीमधील भाडेवापर माहिती आणि करारपत्र सादर करण्याबाबत कळवले आहे. महापालिकेचे कर्मचारी घरफाळा आकारणीसाठी गेल्यावर त्यांच्यावर दबाव टाकून दमदाटी केली जाते. जर पालकमंत्री घरफाळा भरत नसतील, तर सामान्य जनतेने घरफाळा का भरायचा, असा थेट प्रश्‍न असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.  

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com