Coronaviras : घाबरु नका ; कोल्हापूरात १९६ जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

१९६ जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह....’कोरोनापासून दिलासा; १५ जणांचे स्वॅप घेतले; ५७ जणांची तपासणी..

कोल्हापूर : राज्यात कोरोना प्रादुर्भावचा प्रभाव वाढत असला तरी कोल्हापूरसाठी दिलासा देणारी बातमी असून, १९६ रुग्णांचा क्वारंटाईनचा कार्यकाल संपला असून, त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. दरम्यान सीपीआरमधून आणखी पंधरा जणांचे स्वॅप आज तपासणीसाठी प्रयोगशाळकडे पाठविले. दरम्यान, परदेश दौऱ्यावरून आलेल्या तसेच देशांतर्गत दौऱ्यावरून परतलेल्या अशा ५७ जणांची आज तपासणी झाली.

कोरानोचा कक्ष स्थापन झाल्यापासून सीपीआरमध्ये आजअखेर ११८९ जणांचे स्क्रीनिंग झाले आहे. यात भारतातील ७७० व परदेशातील ४१९ जणांचा समावेश आहे. कोरानोचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर १९६ जणांना निरीक्षणाखाली ठेवले होते. त्यांचा तपासणीचा अहवाल नकारात्मक असला तरी १४ दिवसांचा त्यांचा कार्यकाल महत्त्वाचा होता. हा कार्यकाल पूर्ण झाला असून ते संकटातून बाहेर पडले आहेत. ही बाब दिलासा देणारी आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज सांगितले. स्वॅप तपासणीसाठी पाठविल्यानंतर अहवाल येईपर्यंत अनेकांच्या जीवात जीव नसतो मात्र अहवाल नकारात्मक येऊ शकतो, हे यावरून स्पष्ट झाले.

हेही वाचा- मिरजेत नेपाळहून परतले २८ जण; एक ‘सिव्हिल’मध्ये दाखल....

’कोरोनापासून दिलासा; १५ जणांचे स्वॅप घेतले

सर्दी, खोकला तसेच तापाची लक्षणे दिसल्यानंतर कोरोनोचा संशयित रुग्ण होऊ शकत नाही, हे पूर्वी सांगितले गेले आहे. घश्‍यातील स्वॅप तपासणीसाठी पाठविले की संबंधित रुग्ण हा कोरोना संशयित रुग्ण होऊ शकत नाही, हेही स्पष्ट आहे. आज पंधरा जणांचे स्वॅप प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल काय येतो, यावर वैद्यकीय उपचार अवलंबून असणार आहेत.

हेही वाचा- मुंबईतून अनेक तरूण दुचाकीवरून गावच्या दिशेने...

अलगीकरण कक्षात प्रवाशी
दरम्यान ज्या ५७ जणांची आज तपासणी झाली ती बहुतांशी मंडळी नेपाळ, दुबई, राजस्थान, पुणे, मुंबई, दिल्ली, बिहार, बंगळूर, सातारा, बारामती, अजमेर, पतियाळा, नवी मुंबई, हैदराबाद येथून परतली आहेत. सायंकाळी नेपाळहून धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या महिला प्रवाशांची तपासणी झाली. आयसोलेशन रुग्णालयात प्रवाशी आता अलगीकरण कक्षात राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont be afraid people 196 report negative in kolhapur marathi news