...तर उद्योजक आणखी जास्त अडचणीत येवू शकतात ; महाजन 

dont rush to start an industry say vinay mahajan ichalkaranji
dont rush to start an industry say vinay mahajan ichalkaranji
Updated on

इचलकरंजी : सोमवारपासून काही उद्योग सशर्त चालू करण्याचे निर्देश शासना कडून प्राप्त होत आहेत. परंतु इचलकरंजी शहर आणि परिसरातील यंत्रमाग उद्योजकांनी आपले उद्योग चालू करण्याची कोणतीही घाई करु नये, तसे कोणीही प्रयत्न करीत असतील तर तो उद्योजक आणखी जास्त अडचणीत येवू शकतात, अशी भीती यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केले आहे.
  

शासन निर्णयानुसार सोमवारपासून यंत्रमागधारकांनी आपले उद्योग चालू करण्याचे ठरवले तर सर्व प्रथम ते महापालिका अथवा नगरपालिका हद्दित नसले पाहिजेत. जे या हद्दी बाहेरील उद्योग आहेत त्यांना सर्व प्रथम शासनाच्या ऑनलाइन वेबसाईटवर जाउन आपले अर्ज करावे लागतील. शासनाने ज्या अटी व निर्बंध घातले आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे लागेल. या सर्व अटी आपण पूर्ण काटेकोर पणे पाळल्या म्हणून आपला उद्योग व्यवस्थित चालेल असे होणार नाही. कारण आपल्या व्यवसायाला लागणारा कच्चा माल म्हणजेच सूत आपल्या इथे जास्तीत जास्त दक्षिण भारतातून येतो. तो लगेच यायला सुरवात होईल अशी परिस्थिति  सध्या नाही. गुंटूर, कोइमत्तूर, इरोड या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्या मुळे तेथील सुत गिरण्या देखील कधी सुरु होतील याची कोणतीही शाश्वती नाही. आपले तयार झालेले कापड़ चेकिंग होणार नाही. कारण कापड बाहेर गावी जाऊ शकत नाही. आपण लॉक डाउन पूर्वी पाठवलेल्या कापडाचे पेमेंट अद्याप आलेले नाही. तयार केलेल्या कापडाला लगेच मागणी येऊ शकणार नाही. त्याचे कारण म्हणजे पाली,  बालोतरा, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कलकत्ता, सूरत इत्यादी प्रमुख बाजारपेठ अजून लॉकडाउन आहेत.

आपण आपले उद्योग सोमवारपासून चालू केले तर जास्तीत जास्त ८ ते १० दिवसात आपला हा उद्योग पुन्हा या सर्व कारणांमुळे आपोआप बंद पडेल. त्यामुळे सर्व यंत्रमागधारकांनी आपले उद्योग सध्या तरी सुरवात करण्याची घाई करु नये, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com