esakal | दोनवडेत भीषण अपघात : टेम्पो ड्रायव्हर जखमी

बोलून बातमी शोधा

donwade Terrible accident Tempo driver injured crime marathi news}

दोनवडे येथे मोठ्या वळणावर  एका  चारचाकी वाहनाला एस टी ओव्हरटेक करत असताना रॉंग साईटला एसटी जाऊन टेम्पोवर जोरात धडकली.

दोनवडेत भीषण अपघात : टेम्पो ड्रायव्हर जखमी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे (कोल्हापूर)  : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे  ता. करवीर येथे एसटी ने टेम्पोला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोचा चक्काचूरा झाला असून टेम्पो ड्रायव्हर जखमी झाला. रोहन कामीरकर रा. बाजार भोगाव,असे जखमीचे नाव आहे. यावेळी एसटी ड्रायव्हर याने  पलायन केले असून वाहतुकीची कोंडी झाली आहे.

घटनास्थळावरून  मिळालेल्या माहितीनुसार,

रंकाळा  स्टँड येथून कोदे गावाकडे एसटी. एम. एच. ०६ एस ८३८० सकाळी साडेनऊ वाजता जात असताना, याच वेळी बाजार भोगाव येथून मालवाहतूक टेम्पो नं. एम. एच.१४ एफ ८८०० कोल्हापूरला निघाला होता. दोनवडे येथे मोठ्या वळणावर  एका  चारचाकी वाहनाला एस टी ओव्हरटेक करत असताना रॉंग साईटला एसटी जाऊन टेम्पोवर जोरात धडकली. यामध्ये टेम्पो ड्रायव्हर गंभीर जखमी झाला,आणि टेम्पोचा चक्काचूरा झाला, एसटीचे ही मोठे नुकसान झाले. यावेळी एसटी  ड्रायव्हर पळून गेला. यानंतर वाहतुकीची कोंडी झाली आहे. पोलीस वेळेवर येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा- जनावरांच्या गोठ्यात त्या दोघांना बघून नातेवाईकांनी फोडला हंबरडा; गावावरही पसरली शोककळा