esakal | उड्डाण पूल परिसरात हत्यारे घेऊन पाठलाग करून दोघा तरुणांच्या खून प्रकरणी नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेप

बोलून बातमी शोधा

double murder case Railway flyover complex Life threatening crime marathi news}

रेल्वे उड्डाण पूल परिसरात पाठलाग करून तलवार चाकू व हत्या आणि दगडाने दोघा तरुणांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी नऊ जणांना दोषी ठरवले

उड्डाण पूल परिसरात हत्यारे घेऊन पाठलाग करून दोघा तरुणांच्या खून प्रकरणी नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेप
sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर  : रेल्वे उड्डाण पूल परिसरात पाठलाग करून तलवार चाकू व हत्या आणि दगडाने दोघा तरुणांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी नऊ जणांना दोषी ठरवले. त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयदीप उर्फ हणामा राजू चव्हाण, साहिल उर्फ घायल लक्ष्मण कावळे, रियाज उर्फ काल्या सदरू देसाई, विशाल सागर गिरी, फारुक अहमद शेख, 

सद्दामहुसेन नजीर देसाई, इम्रान राजू मुजावर, धनाजी वसंतराव मिसाळ, रोहित सुधीर कांबळे (सर्व रा. टेंबलाईवडी व विक्रम नगर परिसर) अशी आहेत. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.


 टेंबलाईवाडी उड्डाणपूल व कोयास्को चौक येथे 2 फेब्रुवारी 2014 ला पाठलाग करून दोघांचा निर्घुण खून करण्यात आला नितीन महादेव शिंदे आणि समीर सिराज खाटीक अशी त्यांची नावे आहेत. हल्लेखोरांनी पाठलाग करून तलवार,चाकू,कोयता, आणि दगड आणि हल्ला केला होता. सरकार तर्फे एडवोकेट पाटील यांनी 34 साक्षीदार तपासले.

हेही वाचा- दोनवडेत भीषण अपघात : टेम्पो ड्रायव्हर जखमी