पश्‍चिम महाराष्ट्रात वीजबीलाची थकबाकी 2359 कोटींवर

 Electricity arrears in Western Maharashtra at Rs 2359 crore
Electricity arrears in Western Maharashtra at Rs 2359 crore

कोल्हापूर : वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीतील 47 लाख 30 हजार 900 वीजग्राहकांकडे तब्बल 2359 कोटी 13 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा अद्यापही सुरु ठेवण्यात आला आहे. थकबाकीमुळे महावितरणवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी चालू वीजबिलांसह थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन पुणे प्रादेशिकचे प्रभारी संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. 
गेल्या ऑक्‍टोबर ते डिसेंबरपर्यंत तीन महिन्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीतील थकबाकीदारांच्या संख्येत तब्बल 14 लाख 90 हजार 300 ग्राहकांची भर पडली आहे. थकबाकी देखील 693 कोटी 2 लाखांनी वाढली आहे. सद्यस्थितीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये 47 लाख 30 हजार 900 वीजग्राहकांकडे 2359 कोटी 13 लाख रुपयांची थकबाकी आहे. 
कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील उच्च व लघुदाब ग्राहकांना चालू वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी डाऊन पेमेंटची गरज नाही. तसेच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या सुरु आहे. मात्र वीजबिल थकीत आहे, अशा तसेच तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी 30 टक्के डाऊनपेमेंट करून सुलभ हप्त्यांच्या योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. 
सोबतच खंडित झालेली वीजजोडणी पुनर्जोडणी शुल्क भरून किंवा सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यास नवीन वीजजोडणी घेण्याची सोय आहे. अनलॉकनंतर विजेची मागणी वापर वाढल्याने पूर्वपदावर आली आहे. मात्र, एकीकडे वीजबिलांच्या रकमेचा भरणाच होत नाही. त्यामुळे दुसरीकडे महावितरणला अन्य कंपन्यांची व इतर देणी देणे अशक्‍य होऊन बसले आहे. 

घरबसल्या पडताळणी 
वीजबिल भरणा केंद्रासोबतच लघुदाब वर्गवारीतीलसर्व वीजग्राहकांनाघरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईलऍपकिंवा इतर'ऑनलाईन'पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. यासोबतच लॉकडाऊनमधील वीज बिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ लिंकवर उपलब्ध आहे. 

तीन महिन्यांत एक लाख थकबाकीदार वाढले 
कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीमध्ये गेल्या तीन महिन्यांत 1 लाख 5 हजार 350 थकबाकीदारांची व 109 कोटी 77 लाख रुपये थकबाकीची रक्कम वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अकृषक 6 लाख 91 हजार 430 वीजग्राहकांकडे 367 कोटी 56 लाख रुपयांची थकबाकी आहे. 

संपादन - यशवंत केसरकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com