जान है तो जहान हैं; कोरोनाला लाईटली घेऊ नका..! 'या' आमदारांचे भावनिक आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

ज्या प्रकारची लक्षणे दिसून येतात त्याप्रमाणे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने काळजी घ्यावी.

कोल्हापूर - कोरोनाची लक्षणे काही जणांत दिसतात तर काहींमध्ये दिसत नाहीत. तीन आठवड्यानंतर मी घरी आलो आहे; मात्र, 21 दिवसांत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. "जान है तो जहान है, कोरोनाला लाईटला घेऊ नका...', असे आवाहन आमदार ऋतूराज पाटील यांनी सोशल मीडियावरून केले आहे. "कोरोना पॉझिटिव्ह असण्याचे तीन आठवडे' अशा मथळ्याखाली त्यांनी आपले अनुभव शेअर केले असून त्यातून सर्वांना आवाहनही केले आहे. 

ज्या प्रकारची लक्षणे दिसून येतात त्याप्रमाणे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने काळजी घ्यावी. जे कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर लगेच जोराने कामाला लागू नये. कोरोनाचा विषाणू जरी गेला असला तरी फुप्फुसाला पूर्ण रिकव्हर व्हायला वेळ द्यावा लागतो. काही जण लगेच कामाला लागत असल्याने पुन्हा त्यांच्या तक्रारी बळावू लागत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सकस आहार, सकारात्मक विचार आणि औषधांबरोबरच डॉक्‍टरांच्या सूचनांचे योग्य पालन याच गोष्टी कोरोनाला हरवू शकतात. कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही; त्यामुळे आपण सर्वांनीच योग्य ती काळजी घेऊन ही लढाई लढली पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

हे पण वाचा -  ... अन् ती डॉक्टर झालीच ; कहाणी एका जिद्दीची!

 

मनाची घालमेल करणारी घरातील परिस्थिती आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपचारांवर बारीक लक्ष ठेवल्याने कठीण प्रसंगातून बाहेर पडल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. 

हे पण वाचामराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास, ; खासदार संभाजीराजेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: emotional appeal of mla ruturaj patil