Coronavirus : परगावाहून येणाऱ्या प्रत्येकावर राहणार आता वाॅच.....

everyone coming tourist Entering the city after inspecting kolhapur marthi news
everyone coming tourist Entering the city after inspecting kolhapur marthi news
Updated on

कोल्हापूर : परगावाहून कोल्हापुरात येणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करडी नजर ठेवली जात आहे. भुवनेश्‍वरहूनआलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकावरूनच आज ताब्यात घेऊन केएमटी बसमधून त्यांना थेट सीपीआरमध्ये नेण्यात आले. शहराच्या चारही नाक्‍यांवर आरोग्य विभागाचे पथक तैनात केले आहे. परगावांहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून परगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी खास पथक नियुक्त केले आहे. ज्येष्ठ नागरीक पर्यटन संस्थेने भूवनेश्‍वरहून कोल्हापुरात आलेल्या सर्व नागरिकांना आज मोटार वाहन निरीक्षक प्रशांत इंगवले यांच्या पथकाने रेल्वेस्थानकावरच रोखले. तेथून त्यांना थेट केएमटी बसने सीपीआरमध्ये नेण्यात आले.याचबरोबर ३१ मार्चपर्यंत कोणकोणत्या सहली कोल्हापुरात येत आहेत, याचीही माहिती पथकाने घेतली आहे.

प्रत्येक नाक्‍यावर वैद्यकीय पथक

येत्या २७ मार्चला आणखी काही पर्यटक नेपाळहून कोल्हापुरात येणार आहेत. काही शिखरजीहून कोल्हापुरात येणार आहेत. याचीही माहिती इंगवले यांच्या पथकाने घेतली आहे.दरम्यान कोल्हापुरात येणाऱ्या परगावांतील पर्यटकांची वैद्यकीय चाचणीही नाक्‍यांवरच केली जात आहे. यासाठी प्रत्येक नाक्‍यावर वैद्यकीय पथक तैनात आहे. येथे ताप व इतर आजारांची माहिती घेतली जात आहे. त्याचे रेकॉर्डही केले जात आहे. प्रवासी कोठून आले, कोठे जाणार याची याचीही नोंद घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

डिलरकडेच वाहनांचे पासिंग
कोल्हापुरात परगावांहून अधिक प्रवासी येत आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी सीपीआरमध्ये दाखल करणे, कोणते प्रवासी केंव्हा कोल्हापुरात येत आहेत याची माहिती टूर्स ॲण्ड ट्रॅव्हलर्सकडून घेण्याचे कामही एक पथक करत आहे. यासाठी चार मोटार वाहन निरीक्षक आणि आठ सहायक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Police System
Rajaram Puri Ganesh Procession
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com