लिफ्टचा बहाणा....मोटारसायकल चोरीचा कारनामा 

Excuse of elevator .... Motorcycle theft
Excuse of elevator .... Motorcycle theft

कोल्हापूर : लिफ्ट प्लिज, म्हणून एका सेल्समनला तरुणाला दसरा चौक परिसरात थांबवले. मला, "जरा कसबा बावड्यापर्यंत सोड' म्हणून त्याने विनंती केली. माणुसकीचा भाग म्हणून सेल्समनने त्याला लिफ्ट दिली.

जाता जाता औषधांच पार्सल देऊन बावड्याकडे जाऊ, असे त्याला सांगितले. अवघ्या दोन चार मिनिटाच्या प्रवासात तरुणाने सेल्समनच्या तब्येतेची विचारपूस केली. पुढे न्यू शाहूपुरीत सेल्समनने मोटारसायकल थांबवली. गाडीची चावी त्यालाच लावून तो विश्‍वासाने पार्सल घेऊन शेजारील अपार्टमेंटमध्ये गेला. दोन ते तीन मिनीटात खाली आला. तर लिफ्ट मागणारा तरुण मोटारसायकल घेऊन पसार झाला होता. याबाबतची तक्रार घेऊन सेल्समने शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. 

हे झाले प्रातनिधीक उदाहरण, शहर परिसरातून मोटारसायकल चोरीचे प्रमाण चार-पाच वर्षांत वाढले आहे. लॉकडाऊन काळात मोटारसायकलच्या चोरीचे प्रमाण कमालीचे घटले होते. मात्र, जशी शिथिलता येऊ लागली. तसे मोटारसायकल चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे.

राजारामपुरी पोलिसांनी नुकताच दोघा मोटारसायकल चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून 11 मोटारसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. चोरलेल्या मोटारसायकली ते दोघे गहाण ठेवत होते. जेणे करून वाहनांच्या कागदपत्रांची अडचण येऊ नये, याची दक्षताही ते घेत होते. दरम्यान करवीर पोलिसांनी संशयित मोटारसायकल चोरट्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गर्दीच्या ठिकाणाहून चोरलेल्या मोटारसायकली कमी किमंतीला विक्री केल्याची माहिती पुढे येत आहे. 

ही काळजी घ्यायला हवी... 
- अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देताना विचार करा 
- कमी किमंतीला वाहन विक्री करणाऱ्यावर विश्‍वास ठेऊ नका 
- जुने वाहन खरेदी करताना कागदपत्रे नीट तपासा 
- मोटारसायकल गहाण ठेवणाऱ्याची माहिती घेतल्याशिवाय व्यवहार करून नका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com