सातवणेत साकारतोय पंतप्रधानांच्या संकल्पनेतील शेती

Experiment With Multiple Cropping System In Chandgad Taluka Kolhapur Marathi News
Experiment With Multiple Cropping System In Chandgad Taluka Kolhapur Marathi News

चंदगड : सातवणे (ता. चंदगड) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील शेतीचा प्रयोग साकारत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "फार्मर्स प्रोड्युसर कंपनी' स्थापन केली असून राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या हैद्राबाद येथील गानू फार्म्स कन्सल्टींग कंपनीच्या सहकार्याने हा प्रयोग आकाराला येत आहे. सद्या दहा एकरावर या प्रयोगास प्रारंभ झाला असून पुढील काळात तो शंभर आणि त्यापेक्षाही अधिक क्षेत्रावर साकारण्याचा मानस आहे. 

आहे त्याच क्षेत्रात, कमी खर्चात दुप्पट उत्पादन घेणारी पध्दती विकसित करायला हवी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प सोडला आहे. गुडेवाडी (ता. चंदगड) येथील डॉ. परशराम पाटील स्टार्ट अप इंडियाचे सल्लागार आहेत. दिल्ली येथे ते कार्यरत असून खासदार विनय सहस्त्रबुध्दे या प्रयोगाचे मेन्टॉर आहेत.

सातवणे येथे हा प्रयोग साकारण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शाहू सहकारी काजू कारखान्याचे अध्यक्ष मोहन परब यांच्या पुढाकाराने गावातील शेतकऱ्यांना एकत्र करुन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. नुकतेच गानू फार्म्सचे तज्ज्ञ प्रशिक्षक डॉ. चंद्रशेखर पारखी यांनी थेट शेतात जाऊन जमिनीची मशागत, सऱ्या कशा पाडायच्या इथपासून ते लागवडीपर्यंतचे प्रात्यक्षिक दाखवले. 

या विभागात ऊस हे नगदी पिक आहे. उसाच्या कमी अंतरावरील सरींमुळे उत्पादन खर्च वाढतो. उत्पन्न मात्र अपेक्षित मिळत नाही. त्या ऐवजी सरीतील अंतर वाढवायचे, पट्टा पध्दत अवलंबायची आणि मधल्या जागेत भाजीपाला पिक घ्यायचे हे या प्रयोगाचे तंत्र आहे.

प्रत्येक शेतकऱ्याने पिकवलेला भाजीपाला एकत्रीत करुन त्याची शहरात विक्री करायची अशी ही पध्दत आहे. त्यामुळे दर दहा दिवसांनी शेतकऱ्याला भाजीपाल्याचे पैसे मिळतील. सरीतील अंतर वाढल्याने उसाची वाढ चांगली होऊन पूर्वी एवढेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक उत्पादन वाढेल असा अंदाज आहे. गानू फार्म्सने असे प्रयोग यापूर्वीही यशस्वी केले असून चंदगड तालुक्‍याला निसर्गाचे लाभलेले वरदान पाहता इथेही ते यशस्वी होतील याबाबत त्यांना खात्री आहे. 

असा आकाराला येतोय प्रयोग 
- हैद्राबाद येथील गानू फार्म्स कंपनीकडून मार्गदर्शन 
- पट्टा पध्दतीने पिके घेणे 
- सरीतील अंतर वाढल्याने हवा खेळती राहून उत्पादन वाढते 
- ऊस पिकामध्ये आंतरपिक म्हणून भाजीपाल्याची लागवड 
- सद्या बिनीस व घेवड्याची लागवड 
- बियाण्याची निवड, मशागतीपासून लागवड, काढणी ते बाजारपेठे पर्यंत व्यवस्था 
- पहिल्या दिवसापासून खर्चाच्या नोंदी 
- एक वर्षभर राबवला जाणार प्रयोग 
- पुढील वर्षी 1 जानेवारीला प्रयोगाचे यश कळणार 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com