वेगळया नजरेने बघू नका : सर्दी, खोकला, ताप असला म्हणजे कोरोना नव्हे ..

वेगळया नजरेने बघू नका : सर्दी, खोकला, ताप असला म्हणजे कोरोना नव्हे ..

कोल्हापूर  : गल्लीत एखाद्याला सर्दी झाली. तो सर्दीमुळे पटापट शिंकू लागला. सतत खोकत राहिला तरी सारी गल्ली त्याच्याकडे आता कोरोनाच्या नजरेतून पाहू लागली आहे. वास्तविक ताप, सर्दी, खोकला, घसा धरणे हे तसे नेहमीचे आजार. वर्षातून दोन वेळा तरी प्रत्येकाला होतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मात्र या नेहमीच्या आजाराकडे व हा आजार होणाऱ्याकडे संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. सर्दी, खोकला, ताप म्हणजे कोरोना नव्हे, असे तज्ज्ञ डॉक्‍टरांचे मत आहे.

कोरोनाची लक्षणे जरूर सर्दी, पडशासारखी आहेत; पण कोरडा खोकला, त्या जोडीला जादा ताप, घसा सुजणे, तीव्र सांधेदुखी असेल तर ते कोरोनाचे मुख्य लक्षण मानले जाते. खबरदारी म्हणून साधा ताप, खोकला याकडेही या काळात दुर्लक्ष करता कामा नये. परंतु, सर्दी, खोकला ज्याला झाला त्याला कोरोना झाला म्हणून गोंधळ सुरू झाला तर सामाजिक स्वास्थ्य बिघडणार आहे. सर्दी, खोकला, साधा तापाचा आजार झाला तरी लोक भीतीने घरातच बसण्याची शक्‍यता आहे.

कोरोनाची लक्षणे जरूर सर्दी, पडशासारखी आहेत; पण

बुधवारी रात्री बापूरामनगर येथील एक ज्येष्ठ नागरिकाला ज्या पद्धतीने पोलिस बंदोबस्त, रुग्णवाहिका, कर्मचाऱ्यांचा ताफा वापरून घरातून दवाखान्यात नेले गेले ती पद्धत खूप टोकाची ठरली. तो माणूस आपल्याला जुना खोकला आहे म्हणून वारंवार सांगत होता. पण, जमलेल्या हजार - दोन हजार लोकांच्या गर्दीतून त्याला नेण्यात आले. विशेष हे की आज त्याला कोरोनाचे कोणतेही लक्षण नसल्याचे सांगूत पुन्हा घरी सोडण्यात आले. काल रात्रीच त्याला नेताना काही डॉक्‍टर हा कोरोना बाधित नाही, असे सांगत होते.

अज्ञानापोटी दबाव​

पण अज्ञानापोटी दबाव टाकणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे त्या रुग्णाला जबरदस्तीने नेण्यात आले. अर्थात या निमित्ताने त्याची चाचणी झाली, हे चांगले झाले. पण, ज्या नजरेने त्या रुग्णाकडे पाहिले गेले ते खूप विचित्र ठरले. कालची बापूरामनगरमधील घटना ही केवळ झलक आहे. पण, असेच वातावरण पुढेही राहिले तर गल्ली, बोळ, अपार्टमेंटमधील रहिवाशी ताप, सर्दी, खोकला किंवा अन्य आजार झाला तरी सहानुभूती नव्हे तर तिटकाऱ्याच्या नरजेने बघू लागतील व त्याचे पडसाद वेगळे उमटतील. 

ताप, खोकला म्हणजे कोरोना नाही

ताप, खोकला म्हणजे कोरोना नाही हे समजून घेण्याची गरज आहे. अज्ञानातून आपण कोरोनाकडे बघत राहिलो तर निष्कारण आपण पॅनिक होण्याचा मोठा धोका आहे. ताप-खोकल्याच्या प्रत्येक रुग्णाकडे संशयाने पाहू नये व अशा रुग्णांनी शक्‍यतो सात ते आठ दिवस घरातच बसून रहावे.
- डॉ. साईप्रसाद

व्हॉटस्‌ ॲप, फेसबुकवरुन माहितीचा गोंधळ

अलिकडे वैद्यकीय ज्ञानापेक्षा ‘व्हॉटस्‌ ॲप युनिव्हर्सिटी’वर लोकांचा अधिक विश्‍वास आहे. त्यामुळे व्हॉटस्‌ ॲप, फेसबुक या माध्यमातून जी काही बरी-वाईट माहिती कोणीही उठून टाकतो. त्यामुळे नक्कीच गोंधळ उडालेला आहे. ताप, सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांनी किमान आठ ते दहा दिवस घराबाहेर न पडण्याची स्वतःहून खबरदारी घ्यावी. 
- डॉ. निरंजन शहा

पॅनिक होऊ नये

स्वच्छ हात धुणे. कोठेही पचकन न थुंकणे. उघड्यावरचे अन्न न खाणे, या उपाययोजना काही फक्त कोरोनासाठी नाही आहेत. या आपल्या आरोग्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आहे. कोरोना संसर्गाचा आजवरचा इतिहास पहाता परदेशातून आलेल्या व्यक्तींनाच त्याची अधिक बाधा झालेली आहे. त्यामुळे ताप, सर्दी आलेल्या आपल्या शेजार-पाजारच्या प्रत्येकाकडे कोरोनाच्याच नजरेने पाहून पॅनिक होऊ नये. 
- डॉ. शिरीष शानबाग

कोरोना सहजपणे भिडत नाही

कोरोनाची एवढी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण यापूर्वी आपण सार्स, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू या संसर्ग आजारांचा अनुभव घेतला आहे. आपल्याला ताप आला आहे. खोकला आला आहे म्हटले की त्यांना पहिला संशय कोरोनाचा येतो. वास्तविक कोरोना सहजपणे येऊन प्रत्येकालाच भिडतो, असे नाही. 
- डॉ. उद्धव केळवकर

अपुऱ्या माहितीमुळे समाजस्वास्थ्य धोक्‍यात​

चार दिवसांपूर्वी एका वयोवृद्ध महिलेला कफ आणि खोकल्याच्या तीव्र त्रासामुळे उपचारासाठी दाखल केले. तपासणी करण्याअगोदरच नातेवाईक कोरोनाची शंका व्यक्त करू लागले. वास्तविक त्या महिलेला झालेला खोकला वेगळ्या कारणामुळे होता. उपचारामुळे त्यात फरकही पडला. पण, अर्धवट माहितीवर लोक कोरोनाची भीती अकारण वाढवत आहेत. समाजहिताच्या दृष्टीने हे लक्षण खूप धोकादायक आहे. 
- डॉ. सी. टी. पाटील

खबरदारी घ्या फाईट देता येते

कोरोनाबाबत जागरूक असणे आवश्‍यकच आहे. पण, प्रत्येक आजारी व्यक्तीकडे कोरोनासदृश रुग्ण अशा अर्थाने जर आपण बघू लागलो तर तो रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांची अवस्था सांगण्याच्या पलिकडची होऊन जाईल. कोरोना हा जरूर संसर्गजन्य आजार आहे. पण, पुरेशी खबरदारी घेतली तर तो रोखता येतो, हे देखील स्पष्ट झाले आहे.
 डॉ. सतीश पत्की

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com