कोल्हापुरात जमिनीच्या वादातून शेतक-याचा खून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

आज सकाळी 9.30 वाजता गावापासून दोन कि.मी.असलेल्या धामणे-बेलेवाडी रस्त्यावरील पिंपळाच्या सखल शेतात ही घटना घडली. घटनेनंतर संजय पोलिसात हजर झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

उतूर (कोल्हापूर) : आजरा तालुक्यातील धामणे येथे शेतीच्या वादातून शिवाजी परसू सावंत (वय - 55) या शेतक-याचा खून झाला. हा खून शिवाजी यांचा सख्खा चुलत भाऊ संजय महादेव सावंत यांनी केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी 9.30 वाजता गावापासून दोन कि.मी.असलेल्या धामणे-बेलेवाडी रस्त्यावरील पिंपळाच्या सखल शेतात ही घटना घडली. घटनेनंतर संजय पोलिसात हजर झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

हे ही वाचा : Positive Story: मुलगा अधिकारी न होता कॅन्सरने गेला; म्हणून बाजीराव गावातील मुले अधिकारी होण्यासाठी करतात धडपड

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, सावंत परिवारात 1 एकर 14 गुंठे जागेसाठी 15 वर्षापासून वाद सुरु आहे. हा वाद मुंबई येथील उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. आज सकाळी शिवाजी म्हैसीला घेवून शेताकडे गेले होते. यावेळी दबा धरुन बसलेल्या संजय याने शिवाजीच्या डोळ्यात चटणी टाकली. बेसावध असलेला शिवाजी खाली कोसळला. गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर वार केला. हा वार ह-दयाजवळ वर्मी बसल्याने ते जागीच ठार झाले. यावेळी मारेकरी संजयची आई पारुबाई महादेव सावंत (वय -70) ही घटना स्थळी होती. तिचा या खूनात सहभाग होता की नाही हे अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी चप्पल, लोखंडी कोयता, गुप्तीवरील लोखंडी कव्हर पडले होते. 

घटनेनंतर संजय गावी आला व माझ्यावर शिवाजीने हल्ला केला आहे असे सांगू लागला. यानंतर तो पोलिसात हजर झाला. त्याच्या हाताला व डोक्याला मार लागल्याने त्याच्यावर उतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी जावून घटनास्थळी पाहिले असता शिवाजी निपचीत पडलेला आढळला. खुनाची बातमी सा-या चिकोत्रा पंचक्रोशीत पोहचली. नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे दाखल झाले आहेत. घटनेचा पंचनामा सुरु आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A farmer has been killed in a land dispute at Dhamne