जाचक बंधनातून शेतकऱ्याला बंधनमुक्त करण्यासाठीच कृषी विधेयाकांची निर्मिती : सदाभाऊ खोत

राजेंद्र दळवी
Saturday, 26 December 2020

शेतकऱ्याला गरीब ठेवण्याचा पाप कॉंग्रेसने केले असल्याची टीकाही खोत यांनी केली.

आपटी (कोल्हापूर): नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे हिरावून घेतलेले बाजार पेठेचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आपला शेतीमाल विकण्याचे स्वतंत्र मिळाले आहे.त्याच बरोबर शेतमाल विक्रीवर असलेली राज्याबंदी,जिल्हाबंदी,झोनबंदी उठवली गेली आहे.त्यामुळे वर्षानुवर्षे जोखंडात अडकलेल्या शेतकऱ्याला बंधन मुक्त करण्या साठीच नवीन कृषी विधेयाकांची निर्मिती केली आहे.असे मत किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना पन्हाळा येथे सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन किसान
आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना झालेल्या
कार्यक्रमात ते बोलत होते.रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या व शेतकऱ्याला स्वराज्याचा कणा मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरूनच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा केला आहे.नवीन कृषी कायद्यामुळे वेगवेगळया राज्यातील खरेदीदार थेट शेतकऱ्यांच्या शेतावर खरेदी साठी येणार आहेत.कॉन्ट्रॅक्टफार्मिंग मध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचे कॉन्ट्रॅक्ट होणार आहे.

शेतकऱ्याची शेत जामिन शेतकऱ्या जवळच राहणार आहे .या नवीन तीन विधेयकांच्या मुळे शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूक मोठया प्रमाणात होणार आहे. गेल्या सत्तर वर्षात नव तंत्रज्ञान शेती मध्ये येवू दिल ते या नवीन कायद्यामुळे शेतीमध्ये येणार आहे.हे सांगत असताना शेतकऱ्याला गरीब ठेवण्याचा पाप कॉंग्रेसने केले असल्याची टीकाही खोत यांनी केली.त्याच बरोबर जर पूर्वीची व्यवस्था चागली होती. तर देशामध्ये पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली याचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे असे सांगितले.

शेतकऱ्यांच्या  आत्महत्येस कारणीभूत ठरत असलेली जुनी व्यवस्था मोडित काढुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा करुन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.आत्मनिर्भर यात्रेच्या माध्यमातून आम्ही जुन्या जाणत्या शेतकऱ्यांची मते आजमावून घेतली. तेव्हा जर व्यापारी बांधावर येणार असेल तर त्याचे स्वागत आहे.अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या कडून मिळत असल्याचे यावेळी बोलतानागोपीचंद पाडळकर यांनी सांगितले.

 ते म्हणाले, जे शेतकरी नेते नवीन विधेयकाला विरोध करताना शेतकऱ्यांची बाजू मांडत आहेत.पण ते दलालांच्या बाजूचे आहेत तेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करत आहेत.त्यां
शंकेचे निरसन करण्यासाठीच ही आत्मनिर्भर यात्रा चालू केली आहे. नवीन कृषीकायद्याच्या समर्थनार्थ चालू असलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापासून सुरुवात झाली . त्यानंतर पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन
घेऊन व  तेथील लोकांची या विधेयकाबद्दलची मतं जाणून घेऊन यात्रेने पुढे मार्गक्रमण केले.

संपादन-अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers Self reliant travel speech of sadabhau khot kolhapur