जोतिबा डोंगरावर पन्नास हजार भाविक; सोशल डिस्टन्सचा उडाला फज्जा

निवास मोटे
Sunday, 22 November 2020

अनेक भाविकांनी आज आपल्या कुटुंबासहित जोतिबा डोंगरावर हजेरी लावली व देवाचे दर्शन घेतले. पण

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर ता. पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनसाठी आज राज्यभरातून सुमारे पन्नास हजार भाविकांनी डोंगरावर गर्दी केली. त्यामुळे डोंगरावर खेट्याचे स्वरूप प्राप्त झाले. आज रविवार असल्याने पहाटेपासून डोंगरावर भाविक येण्यास सुरुवात झाली .

करवीर निवासनी श्री आंबाबई देवीच्या दर्शनसाठी नियमीत तीन हजार भाविकांना दर्शन दिले जात आहे. मात्र जोतिबाच्या डोंगरावर आज सुमारे पन्नास हजार भाविकांनी डोंगरावर गर्दी करत सोशल डिस्टन्सचा फज्जा  उडवला आहे.

सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते सांयकाळी ७ या वेळेतच मुख्य मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. कामधेनू गाय जवळ असणाऱ्या दरवाजातून भाविकांना सोडण्यात येत होते व दक्षिण दरवाजातून बाहेर येण्याचा मार्ग होता. त्यामुळे  मोठी गर्दी असल्यामुळे रांगेतून भाविकांनी दर्शन घेतले पण अन्य भाविकांना मात्र कळस दर्शनावरच समाधान मानावे लागले.

हेही वाचा- हत्तीचा धुडगूसच: शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली; गायीवर हल्ल्याचा प्रयत्न

 भाविक मुख्य मंदिरात जाताना मास्क  व  सॅनी टायझर लावून जात होते पण मंदिराच्या बाहेर मात्र सोशल  डिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसत होता. तब्बल सात महिन्यानंतर डोंगर आज गर्दीने फुलून गेला. दिवसभर भाविकांच्या झुंडी येत आहेत. मंदीरात आज सकाळी पाद्य पूजा , काकड आरती ,मुख मार्जन या विधीनंतर मंगलपाठ झाले . अभिषेकावेळी केदार स्त्रोत, केदार कवच यांचे पठण झाले. त्यानंतर सकाळी जोतिबा देवाची सांलकृत महापूजा बांधण्यात आली .

 अनेक भाविकांनी आज आपल्या कुटुंबासहित जोतिबा डोंगरावर हजेरी लावली व देवाचे दर्शन घेतले.  तर पन्नास टक्के भाविक डोंगरावर बिनधास्त  ये जा करताना दिसत होते. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty thousand devotees people on Jyotiba temple