कोल्हापूर: महाद्वाररोडवरील कोल्डींक हाऊसला आग 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

पहाटेच्या सुमारास या कोल्ड्रींक हाऊसच्या पहिल्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे एका वृत्तपत्र विक्रेत्यांच्या लक्षात आले

कोल्हापूर - महाद्वारोडवरील कोल्ड्रींक हाऊसच्या पहिल्या मजल्यावर पहाटे शॉर्ट सर्कीटने आग लागली. अग्निशामक दलाने सतर्कता दाखवत ही  आग सुमारे अर्धातासाच्या प्रयत्नानंतर अटोक्‍यात आणली. यात फ्रीज्‌, फर्निचरसह सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, महाद्वाररोडवर धवल भगवान पोवार यांचे "तृषाशांती' कोल्ड्रींक हाऊस आहे. पहाटेच्या सुमारास या कोल्ड्रींक हाऊसच्या पहिल्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे एका वृत्तपत्र विक्रेत्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. तसे घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन बंब दाखल झाले. दरम्यान शेजाऱ्यांनी कोल्ड्रींक हाऊसचे मालक पोवार यांना याची माहिती दिली. तेही घटनास्थळी दाखल झाले. पहिल्या मजल्यावरील फर्निचर, सिलींग, वायरिंगसह येथील फ्रीजसह मशीन या आगीत जळून खाक झाले.

हे पण वाचा जिल्हा प्रशासन थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीच्या भक्कमपणे पाठीशी : दौलत देसाई

 

तब्बल अर्धातासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग अटोक्‍यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पण या आगीत सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचे मालक पोवार यांच्याकडून सांगण्यात आले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at Coldink House in kolhapur Mahadwar Road