नियम, अटी काटेकोर पाळा; हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाउस सुरू करा 

follow the rules, conditions; Start hotels
follow the rules, conditions; Start hotels

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त निवास व्यवस्था असणाऱ्या हॉटेल्स आणि इतर आदरातिथ्य सेवा देणारे लॉज, गेस्ट हाउस 33 टक्के क्षमतेसह उद्या (ता. 8) नियम व अटींच्या अधीन राहून सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. 

कोल्हापूरमध्ये हॉटेल, गेस्ट हाउस सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक पोस्टर्स, स्टॅंडिज, एव्ही मीडिया (ऑडिओ-व्हिज्युअल) मार्गदर्शक करावे. पार्किंग व इतर मोकळ्या जागेत गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हॉटेलमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी बैठक व्यवस्थेचे नियोजन करावे. प्रतीक्षा करणाऱ्यांसाठीही बाहेरील बाजूस रांगांमध्ये बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. प्रवेशद्वारात थर्मल स्क्रीनिंग करावे. स्वागत कक्षाला संरक्षक काच बसवावी. ग्राहकांसाठी पायाने ऑपरेट डिस्पेंसर हॅंड सॅनिटायझर, ऑटोमॅटिक सेन्सर असलेले डिस्पेंसर, हॅंड सॅनिटायझर असणे गरजेचे आहे. 

चेहरा झाकणारे कव्हर, मास्क, ग्लोव्हज वैयक्तिक संरक्षणासाठी वापरले पाहिजेत. कोणतीही कोरोनासदृश आजाराची लक्षणे नसलेल्या ग्राहकांना प्रवेश दिला पाहिजे. ग्राहक गेल्यावर 24 तास संबंधित खोली रिकामी ठेवावी. तसेच निर्जंतुकीकरण करून घेतली पाहिजे. गादी, बेडशिटसह पडदे बदलावे लागतील, असेही नियम करण्यात आले आहेत. दरम्यान, नियम व अटींसह हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

या आहेत सूचना.. 
- जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश 
- हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्ससाठी बैठक व्यवस्था करा 
- प्रवेशद्वारात थर्मल स्क्रीनिंग करावे 
- स्वागत कक्षाला संरक्षक काच बसवा 
- पायाने ऑपरेट डिस्पेंसर हॅंड सॅनिटायझर बसवा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com