कॉलेज कॅन्टीनमध्ये आता नो जंक फूड...

The Food and Drug Administration has decided to expel junk food from canteens of schools colleges
The Food and Drug Administration has decided to expel junk food from canteens of schools colleges
Updated on

कोल्हापूर - शाळा, महाविद्यालयांच्या कॅन्टीनमधून जंक फूड हद्दपार करण्याचा निर्धार अन्न, औषध प्रशासन विभागाने घेतला आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांचा लठ्ठपणा वाढत चालल्याने भविष्यात त्यांच्या आरोग्याला धोका ओळखून शाळा- महाविद्यालयांतील कॅन्टीनमध्ये जंक फूडची विक्री करू नये, असे आवाहन या विभागाने केले आहे. 

दुष्परिणामांबाबत होणार जनजागृती

लोकांच्या खाण्याच्या सवयी जशा बदलतात तसे त्याचे आरोग्यावर परिणाम दिसत आहेत. जिभेला चव आणणारे पदार्थ खावेसे वाटले तरी त्याचा आरोग्याच्या दृष्टीने उपयोग नसतो. अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यापासून मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत आहे. आरोग्य विभागाच्या पाहणीत जंक फूडचे वाढते सेवन हे धोकादायक असल्याचे पुढे आले. या पदार्थांत उष्माकांचे (कॅलरीज) प्रमाण अधिक असते. शालेय अथवा महाविद्यालयीन वयातच मुले लठ्ठ दिसू लागली आहेत. स्थूलपणाचे परिणाम घातक असल्याने भविष्यात या मुलांना मधमुेहासारख्या आजाराला सामोरे जावे लागणार आहे.

पालकांना नवा खाद्यपदार्थ आहे याचे औचित्य वाटते. मुले शाळा तसेच महाविद्यालयाच्या आतमध्ये गेली आणि तेथे कॅन्टीनमघ्ये जंक फूड नजरेस पडल्यानंतर मुले पटकन  त्याकडे आकर्षित होतात. जंक फूडवर आजच नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात त्याची विक्री वाढत जाईल. नवी पिढी शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यापेक्षा ती कमकुवत होईल यासाठी अन्न. औषध प्रशासनाने शाळा महाविद्यालयात कार्यशाळा सुरू केल्या आहेत. यात कॅन्टीनचा ठेकेदार तसेच विद्यार्थ्यांना जंक फूडच्या दुष्परिणामांची माहिती दिली जात आहे. जंक फूडऐवजी शिरा, पोहे. उप्पीट असे कमी उष्मांक असलेले पदार्थ विक्रीची विनंती केली जात आहे. खाद्यपदार्थांच्या मेनूची यादी आहे त्यात जंक फूड असे नये, असे सांगितले जात आहे. जंक फूडसारखे सेवन झाल्यास त्याचा परिणाम स्थूलपणावर होतो. 

जंक फूडचे काही घातक परिणाम समोर आल्याने शाळा- महाविद्यालयांतून जंक फूडच्या विरोधात प्रबोधन सुरू केले आहे. त्यासाठी कार्यशाळा सुरू आहेत. जंक फूडऐवजी कमी उष्मांक असलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवावेत, अशी सूचना केली जात आहे.
- मोहन केंबळकर, सहायक आयुक्त
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com