...."अन्यथा कोल्हापुरातील कोरोना स्थिती गंभीर'

former chief minister devendra fadnavis press conference Proposal for government covid 19  patient Requires 300 ICU and 400 oxygen beds
former chief minister devendra fadnavis press conference Proposal for government covid 19 patient Requires 300 ICU and 400 oxygen beds
Updated on

कोल्हापूर : राष्ट्रीय सरासरी पेक्षा कोल्हापुरात मृत्यू दर अधिक तर राज्याच्या बरोबरीत आहे. त्यामुळे आणखी 300 आयसीयु आणि 400 ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. तो विनाविलंब मंजुर करावा, अन्यथा कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची स्थिती अधिक गंभीर होईल. प्रस्ताव मंजुरीसाठी मी स्वतः मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना हे ज्ञात करून देणार असल्याचेही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धावता आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 


फडणवीस म्हणाले," पश्‍चिम महाराष्ट्रात कोरोना बाबतचा आढावा घेण्यासाठी दौरा सुरू आहे. त्यातून आज सीपीआर मधील कोरोना विभागाची पाहणी केली. तेथे नवीन ऑक्‍सिजन टॅंक बसवला ही अतीशय चांगली गोष्ट आहे. ऑक्‍सिजनची आवश्‍यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कोल्हापुरात वेगाने वाढतो आहे. परिस्थिती गंभीर होत आहे. "इन्फेक्‍शन रेशो' 20 ट्‌क्‍कांपर्यंत पोचला होता. गेल्या आठ दिवसांत तो 25 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. यातून प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात येते. "आरटीपीसीआर टेस्ट' रोज सतरा ते अठराशे होत आहेत. त्याचीही संख्या अजून वाढविली पाहिजे. यासोबत "रॅपीड ऍन्टीजेन' वाढविणे आवश्‍यक आहे.

आरटीपीसीआर ज्यास्त होत आहे. ऍन्टीजेन वाढविण्याला वाव आहे. त्यातून रेशो कमी करता येईल. टेस्टींग वाढविल्यावर संसर्गने होणारा कोरोनाचा प्रभाव कमी होतो. येथे कोविड सेंटरची व्यवस्था चांगली आहे. मोठ्या प्रमाणात आयसीयु बेडची आवश्‍यकता आहे. आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, की 400 ऑक्‍सिजन आणि 300 आयसीयु बेड वाढविण्याची गरज आहे. त्याचा प्रस्ताव राज्यशासनाला पाठविला आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्काळ मान्यता दिली पाहिजे. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे (शहर), जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे (ग्रामीण) आदी उपस्थित होते. 

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस म्हणतात  निर्णय घ्या.. मग तो कोठून ही घ्या....
 
आजची स्थिती पाहता रोज 20 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागणार आहे. 15 टक्के लोकांना ऑक्‍सिजन बेड लागतील. काहींना एनआयव्ही लागेल. 2 ते 3 टक्के लोकांना व्हेन्टीलेटर लागेल. अधिक वेळ घालवला तर आत्ताच कोल्हापुरात मृत्यू दर तीन टक्के आहे. राष्ट्रीय सरासरी पेक्षा तो जादा आहे. राज्यात जवळजवळ बरोबरीत आहे. आयसीएमआरच्या सुचनेनुसार संसर्ग सरासरी पाच टक्के तर मृत्यूदर एक टक्के दिला आहे. त्यानुसार कोल्हापूरचा दर अधिक असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला प्रस्ताव तातडीने मंजुर न झाल्यास पुन्हा मृत्यूदर वाढण्याची शक्‍यता आहे. सध्या 80 टक्के रुग्ण हे "ए' सिन्टोमेटीक आहेत. ही चांगली गोष्ट आहे. होम आयसोलेशन करून त्यांना बाहेर काढू शकतो. ही कार्यवाही सुद्धा होत आहे. मात्र ऑक्‍सिजन आणि व्हेटीलेटरच्या मंजुरीनंतरही प्रत्यक्षात यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी पंधरा वीस दिवसाचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे विनाविलंब हा प्रस्ताव मंजुर होणे अपेक्षीत आहे, असे न झाल्यास मृत्यू दर वाढू शकतो. असेही फडणवीस यांनी सांगितले. 

संपादन - अर्चना बनगे


   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com