'महाडिकांनी 'त्या' पाच हजार लोकांची यादी जाहीर करावी' 

former congress corporator criticize on dhananjay mahadik marathi news
former congress corporator criticize on dhananjay mahadik marathi news

कोल्हापूर :  माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून भीमा उद्योगसमूहामध्ये पाच हजार लोकांना रोजगार दिला असेल तर त्यांनी या पाच हजार लोकांची नावे जाहीर करावी. इतक्‍या लोकांना रोजगार देण्याइतपत भीमा उद्योग समूह मोठा आहे का ? तसेच स्वतः माजी खासदार धनंजय महाडिक भोगवटादार असलेल्या भीमा एज्युकेशन सोसायटीचा कागल नगरपालिकेचा घरफाळा का भरलेला नाही ? पंढरपूरच्या भीमा साखर कारखान्यातील शेतकरी, कर्मचारी यांची कोट्यवधीची देणी का भागवली नाहीत? असा सवाल माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण आणि माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, आशिष ढवळे यांनी महापालिकेच्या हिताबाबत शिकवू नये. उलट घोडेबाजार करून स्थायी सभापती झालेल्या ढवळे यांनी काय काम केले. याचे आत्मपरीक्षण करावे. खासदार असताना धनंजय महाडिक यांनी पाच वर्षात महापालिकेला किती निधी दिला?, अठरा वर्षे विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी शहरासाठी किती निधी दिला? शहराच्या विकासासाठी महाडिक यांनी एकतरी सार्वजनिक हिताचा प्रकल्प सुरू केला आहे का ? याची माहिती कोल्हापूरच्या जनतेला द्यावी.

रोजगार देण्याऐवजी तो काढून घ्यायचे काम माजी खासदार यांनी केले आहे. भीमा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू असलेले विकासवाडी येथील इंजिनीरिंग कॉलेज बंद पडले आणि त्या ठिकाणी काम करत असलेल्या लोकांचा रोजगार गेला. त्यांना कित्येक महिने पगार सुद्धा मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती असताना त्यांनी पाच हजार रोजगार दिला, हे म्हणणे कितपत खरे आहे ?  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com