ब्रेकिंग- कोल्हापुरातील माजी नगरसेवकाच्या आईचे कोरोनाने निधन 

Former corporators mother dead in Kolhapur
Former corporators mother dead in Kolhapur

कोल्हापूर - शहरातील माजी नगरसेवकाच्या आईचे आज निधन झाले असून त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यामुळे शहरातील गंजीमाळ परिसरात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय विभागातर्फे संबंधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तीव्र संपर्कातील व्यक्तींना सीपीआर रुग्णालयात आणून त्यांच्या लक्षणानुसार स्वॅब घेतले जाणार आहेत. अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.


आज दिवसभरात ५९ नव्या रूग्णांची भर 

दरम्यान, आज दिवसभरात तब्बल ५९ नव्या रूग्णांची भर पडली आहे. दिवसभरातील ५९ रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या ११२८ वर पोहोचली आहे. 

आता आलेल्या नव्या २५ पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये चंदगडमधील १७, कोल्हापूर शहर एक, करवीर एक, शिरोळ तीन तर शाहुवाडीतील दोघांचा समावेळ आहे. 

सायंकाळचे ३४ रूग्ण 
सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये पन्हाळा आठ, कसबा बावडा एक, गडहिंग्लज चार, हातकणंगले एक,  शिरोळ दोन, कागल एक, गांधीनगर एक, टोप एक, कोल्हापूर शहर पाच, गारगोटी एक, राधानगरी एक, शाहुवाडी  एक तर इचलकरंजीतील सहा व्यक्तींचा समावेश आहे.  

शिवाजी पार्कात पोलीस अधिकाऱ्यांची पत्नीच कोरोना पॉझीटीव्ह 
 
शिवाजी पार्कात रहाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल आज पॉझीटीव्ह आला. संबंधित दाम्पत्य पुण्याहून दोन दिवसांपुर्वी कोल्हापुरात आले होते. 

ज दिवसभरात जिल्ह्यातील 34 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. त्यात या पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचा समावेश आहे. संबंधित कुटुंब शिवाजी पार्कात रहात असले तरी पुण्याहून आल्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या दोघांचेही घशातील स्त्रावाचे नमुने काल तपासणीसाठी सीपीआर रूग्णालयात दिले होते. त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझीटीव्ह आला. अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संबंधित दाम्पत्य हे कोल्हापुरात आल्यापासून संस्थात्मक अलगीकरण कक्षात असल्याने शिवाजी पार्कातील त्यांच्या घराशेजारील परिसर सील करण्याचा प्रश्‍न आला नाही. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com