मोदींचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्षच; शेतकऱ्यांना अदानी आणि अंबानींचे गुलाम करू नका

founder of Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetty criticize on Prime Minister Narendra Modi
founder of Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetty criticize on Prime Minister Narendra Modi

कोल्हापूर : परदेशातील लोकांना भारतीय शेतकऱ्यांची बाजू योग्य वाटली म्हणून तेही पाठिंबा देत आहेत; पण कायम परदेशात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज येथे केली. 
मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेली तिन्ही कृषी विधेयके तत्काळ रद्द करावीत, अन्यथा केंद्र सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सायंकाळी सातपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन, कीर्तन करीत आत्मक्‍लेश आंदोलन केले. आंदोलन उद्या (ता. ४) सकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहे. त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. 


कृषी मालाला हमी भाव मिळाला पाहिजे किंवा त्याचा दर ठरवण्याची मुभा शेतकऱ्यांना दिली पाहिजे, ही या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. सरकारची कृषी विधेयके उद्योगपतींच्या हिताची आहेत. ती तत्काळ रद्द करावीत. शेतकऱ्यांना अदानी आणि अंबानींचे गुलाम करू नका. सरकारने शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणू नये. त्यांना त्यांच्या हक्काची शेती करू द्यावी.’’


कायद्याने बंधनकारक असणारा हमी भाव मिळावा; पण सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येकाला या आंदोलनात जावे, असे वाटते. आपण जाऊ शकत नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आत्मक्‍लेश आंदोलन करावे लागल्याचेही शेट्टी म्हणाले. या वेळी कार्याध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, अजित पोवार, विक्रम पाटील, राम शिंदे, संजय चौगले, शैलेश आडके, विठ्ठल मोरे, अण्णा मगदूम, भीमगोंड पाटील, राजू पाटील, सचिन शिंदे, पायगोंडा पाटील, अविनाश मगदूम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
कंत्राटी शेती लुबाडणारी
कंत्राटी शेती पद्धत शेतकऱ्यांना लुबाडणारी आहे. कोणी स्टार्चचे कंत्राट, कोण कलिंगड घेतो म्हणतो, कोण मका घेतो म्हणतो, एकाने कोंबड्या घेतो म्हणून सांगितले होते. तोही फरारी झाला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचेही श्री. शेट्टी म्हणाले.

काँग्रेसचाही पाठिंबा
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, संजय वाईकर यांनी रात्री उशिरा आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.

 संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com