सांगली : बोरगाव गावावर शोककळा ; दोन दिवसात चार जणांचा कोरोनाने मृत्यू 

four person dead in two days at sangli borgaon
four person dead in two days at sangli borgaon

नवेखेड (जि. सांगली)  : बोरगाव (ता. वाळवा) येथील एका राजकीय नेत्याचा आणि दोन उमद्या तरुणासह आणखी एकाचा दोन दिवसात कोरोनाने मृत्यू झाल्याने बोरगाव गावावर शोककळा पसरली आहे. कोरोनाला गावाबाहेर रोखण्यात यश मिळविलेल्या ग्रामस्थांना यामुळे धक्का बसला आहे. 

गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. बोरगावचे माजी सरपंच अशोकराव पाटील यांचेही कोरोना विरुद्ध लढताना निधन झाले. मनमिळावू स्वभावाच्या पाटील यांचे असे अचानक निधन झाल्याने लोक गहिवरले. कालच्या प्रमाणे आजचा दिवस ही बोरंगावकरसाठी काळा दिवस ठरला. या गावचे तरुण ग्रामसेवक रघुनाथ आप्पा वाटेगावकर यांचेही कोरोना विरुद्ध लढताना निधन झाले. मितभाषी असणारे वाटेगावकर कर्मचारी वर्गात लोकप्रिय होते. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ कोल्हापूर शाखा सांगलीचे संघटक म्हणून कार्यरत होते. 

आज दुपारी खो खोचे राष्ट्रीय खेळाडू आणि जयजवान मंडळाचे बिनीचे खेळाडू मिलिंद पंढरीनाथ पाटील हा तरुणही कोरोनाचा बळी ठरला. बोरगाव बझार, गुरुकृपा शेती केंद्र या माध्यमातून ते कार्यरत होते. अतिशय मनमिळावू स्वभावाचे ते होते. तर शिवछत्रपती पाणीपुरवठा संस्थेचे कर्मचारी दिनकर  भीमराव वाटेगावकर या कर्त्या पुरुषाचेही कोरोनाने निधन झाले. 

एक अस्वस्थ वातावरण  बोरगाव ग्रामस्थ गेली दोन दिवस झाले अनुभवत आहेत. या चार घरातील हे कर्ते पुरुष अचानक सोडून गेल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com