esakal | अन् त्या कोल्ह्याने शिवारात ठोकली धूम!

बोलून बातमी शोधा

Fox bidri kolhapur marathi news}

रुणांनी धाडसाने या कोल्ह्याची सुटका करुन त्याला दिलेल्या जीवनदानामुळे या तरुणांचे परिसरात कौतुक होत आहे

अन् त्या कोल्ह्याने शिवारात ठोकली धूम!
sakal_logo
By
दत्तात्रय वारके

बिद्री (जि. कोल्हापूर) : चार दिवसांपूर्वी कोरड्या विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला तरुणांनी जीवदान दिले. भुकेने व्याकूळ झालेल्या या कोल्हयाने सुटका होताच शिवारात धूम ठोकली. बिद्री ( ता. कागल ) येथील तरुणांनी धाडसाने या कोल्ह्याची सुटका करुन त्याला दिलेल्या जीवनदानामुळे या तरुणांचे परिसरात कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बिद्री गावचे ग्रामस्थ अजित पाटील यांना चार दिवसांपूर्वी एक कोल्हा त्यांच्या शेतातील एका कोरड्या विहीरीत पडलेला दिसला. त्यावेळी त्यांनी हा कोल्हा बाहेर पडून निघून जाईल असा विचार केला. परंतू चार दिवसानंतर पुन्हा आज ते शेताकडे गेले असता त्यांना तो कोल्हा अजूनही विहीरीतच असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत आपले मित्र सयाजी चौगले, प्रा. दिगंबर पाटील, महेश देसाई, अक्षय पाटील, सतेज पाटील यांना माहिती दिली. त्यांनी कोरड्या विहीरीत उतरुन एका रिकाम्या बॅरेलच्या सहाय्याने कोल्हयाला पकडण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्यांनी त्या कोल्हयाला बॅरेलमध्ये पकडून विहीरीबाहेर आणले. 

हे पण वाचा - गोकुळ, केडीसीत घुमशान ; निवडणुकीचा बिगुल वाजला

गेली चार दिवस भुकेने व्याकुळ असतानासुद्धा त्याने कोणाचाही चावा घेतला नाही. सदर कोल्ह्यास विहिरीतून बाहेर काढून सोडून देताच, तो शेतवडीत धुम पळाला. या धाडसी युवकांनी कोल्ह्याचे प्राण वाचवून त्याला जीवनदान दिल्याने त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

संपादन - धनाजी सुर्वे