esakal | अयोध्येच्या भेटीला हिरण्यकेशीचे पाणी...राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यात गडहिंग्लजवासीयांनी असा नोंदविला सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

Gadhinglaj People Gave Hiranyakeshi's Water For Ram Mandir Bhumipujan Kolhapur Marathi News

सध्या देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी मोजक्‍याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. देशभरातील लोकांचा या सोहळ्यात अप्रत्यक्ष सहभाग व्हावा यादृष्टीने देशातील विविध पवित्र नद्या, संगमक्षेत्र, धार्मिक क्षेत्राच्या आवारातील पाणी, माती संकलीत करण्यासाठी केंद्र शासनद्वारा राममंदिर न्यासाने आवाहन केले होते.

अयोध्येच्या भेटीला हिरण्यकेशीचे पाणी...राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यात गडहिंग्लजवासीयांनी असा नोंदविला सहभाग

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : पाच ऑगस्ट रोजी अयोध्या येथे ऐतिहासिक राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. या सोहळ्यासाठी गडहिंग्लज येथून हिरण्यकेशी नदीचे पवित्र जल आज पाठवण्यात आले. नूलच्या श्री. भगवानगिरी महाराजांच्या माध्यमातून हे जल कोल्हापूरपर्यंत जाणार असून तेथून विहिंपच्या पदाधिकाऱ्यांमार्फत अयोध्येला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

सध्या देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी मोजक्‍याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. देशभरातील लोकांचा या सोहळ्यात अप्रत्यक्ष सहभाग व्हावा यादृष्टीने देशातील विविध पवित्र नद्या, संगमक्षेत्र, धार्मिक क्षेत्राच्या आवारातील पाणी, माती संकलीत करण्यासाठी केंद्र शासनद्वारा राममंदिर न्यासाने आवाहन केले होते. त्यानुसार गडहिंग्लज, आजरा व चंदगड परिसरातील जीवनदायीनी असलेल्या हिरण्यकेशी नदीचे जल पाठवण्यात आले.

नूलमधील रामनाथगिरी समाधी संस्थान मठाचे श्री भगवानगिरी महाराजांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाने हा संकल्प घेण्यात आला होता. यासाठी हिरण्यकेशी फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल चौगुले, प्रशांत बाटे, आदेश विचारे यांनी हे जल संकलीत करण्यात आले. आज भगवानगिरी महाराज यांच्याकडे हे जल सुपूर्द करण्यात आले. या संकल्पनेचे रामभक्तांतून स्वागत करण्यात आले. सुनिल चौगुले, आदेश विचारे, प्रशांत बाटे, राहूल हिडदुग्गी, डॉ. दिलीप मांजरेकर, दयानंद शिंदे, सुनिल नांगरे, दिपक जगदाळे, सचिन पोवार यांच्या हस्ते हा जलकलश महाराजांकडे सुपूर्द केले.

अभ्यासक उमाकांत राणिंगा यांच्या मते, हिरण्यकेशीचा उगम चरणाकडून मुखाकडे आहे. चरणाचे महत्व अनन्य असून त्याला धार्मिक मान्यता आहे. नदीकाठावरील रामतीर्थ येथे प्रभू श्री रामांच्या वास्तव्याने पुनित भूमी आहे. कर्नाटकातील संकेश्‍वरनजीक ही नदी चंद्रभागा रूप धारण केले आहे. विविध देव-देवतांच्या सानिध्यातून हिरण्यकेशीचा प्रवाह पुढे जातो. कृष्णलहरी या धार्मिक ग्रंथात हिरण्यकेशी तीर्थाचे महत्व सांगितले आहे. यासाठी कोल्हापुरचे रणजितसिंह घाटगे यांचे सहकार्य मिळाले. 

संपादन - सचिन चराटी