पक्षांसाठी धान्य बँक; तरूणाचा आगळा उपक्रम

Garmin bank for  Birds in kolhapur panhala
Garmin bank for Birds in kolhapur panhala

जोतिबा डोंगर - जागतिक तापमान वाढ, वायूचे प्रदूषण, जंगलाला लागणारे वनवे, बेसुमार वृक्षतोड, मोठ्या प्रमाणात झालेले औद्योगीकरण, मोबाईलच्या  सुक्ष्म लहरी, प्लॅस्टिक कचरा, आदी कारणामुळे पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. परिणामी पक्ष्यांचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पक्ष्यांचे अस्तित्व व त्यांचा किलबिलाट रहावा यासाठी पोहाळेतील एका पक्षीमित्राने खास पक्ष्यांसाठी धान्य बँक हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमाचे जिल्ह्यात स्वागत होत असून या धान्य बँकेचे उद्घाटन  प्रजासत्ताक दिनादिवशी झाले. ही धान्य बँक सुरु करणाऱ्या ध्येय वेड्या तरूणाचे नाव आहे शिवाजी लहू मिसाळ.
पन्हाळा तालुक्यातील जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे तर्फ आळते हे  गाव. येथील परिसर वनसंपदेने नटलेला आहे. गावाच्या चारी बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्या व पठार असून या डोंगरपठारावर बिबट्यासह साळींदर, रानडुक्कर, ससे, कोल्हे, गवे यांचा वावर तसेच मोर लांडोर, कवडे, स्वर्गीय नर्तक यासह एकशे आठ प्रकारचे पक्षी या डोंगर पठारावर दिसतात. पण  दिवसेंदिवस या ठिकाणी पक्षी कमी होत असल्याचे लक्षात येताच या पक्षी मित्राने पक्षांचे जतन होण्यासाठी त्यांना धान्य खाऊ मिळावा म्हणून धान्य बँक हा उपक्रम सुरू केला.

शिवाजी हे दिवसभर डोंगर पठारावर भटकत पक्ष्यांची निरीक्षण करून पक्षी धान्य कसे शोधतात पाणी व विश्रांती कोठे घेतात. या सर्व हालचालींवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. या डोंगर भागात सध्या ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी, या पशुपक्ष्यांसाठी भात भुईमूग ज्वारी ही पिके  अल्प प्रमाणात असल्यामुळे या पक्ष्यांना चाऱ्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने त्यांनी ही धान्य बँक सुरू केली. मिसाळ यांनी  विविध प्रकारचे धान्य जमा करून ज्या ठिकाणी पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. तेथे दररोज धान्य टाकून पक्ष्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ज्वारी, मका, भात, तांदूळ हे धान्य शिवाजी आपल्या छोट्या किराणा दुकानात जमा करतात. त्यासाठी त्यांनी एक मोठा डबा ठेवला असून त्यात धान्य टाकण्याची सोय केली आहे. ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी, निसर्ग मित्र मुठभर धान्य या डब्यात टाकतात. कालच शिवाजी यांना विविध तरुण मंडळे, ग्रामस्थांसह विविध समुहांनी चाळीस किलो धान्य दिले. हेच धान्य शिवाजी आता डोंगर भागात पक्ष्यांना टाकणार असून निदान अस्तित्वात असणाऱ्या पक्ष्यांना या धान्य बँकेच्या रूपाने खाऊ मिळणार आहे. त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट कायम राहणार आहे.

दरम्यान, शिवाजी यांनी गेल्यावर्षी दहा गुंठे क्षेत्र खास पक्ष्यांसाठी राखीव ठेवले होते. त्यांनी ज्वारी पीक घेतले होते. दोन महिन्यात या पिकाचा फडशा पक्ष्यांनी पाडला होता.

आपल्या शिवारात एक तरी काकरी (सरी ) पक्ष्यांसाठी राखावी

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पशुपक्षांचे जतन करणे काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शिवारात एक तरी काकरी (सरी ) पक्ष्यांसाठी राखावी. 

शिवाजी मिसाळ, निसर्ग मित्र. पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा)


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com