इचलकरंजीत पाईपलाईनद्वारे गॅस

Gas Through Pipeline In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Gas Through Pipeline In Ichalkaranji Kolhapur Marathi News

इचलकरंजी : माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केंद्र सरकारच्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन स्कीमअंतर्गत इचलकरंजी शहरात घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅस योजना मंजूर करून आणली होती. या योजनेतून घरोघरी गॅस जोडणी देण्यास लवकरच सुरवात होत असून, त्याची नोंदणी सुरू केली आहे. नोंदणीची सुरवात हाळवणकर यांचा फॉर्म भरून केली. 

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे माजी आमदार हाळवणकर यांनी सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन योजनेत इचलकरंजी शहराचा समावेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या योजनेत शहराचा समावेश होऊन एचपीसीएल आणि ओआयएल इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांनी एचपी ओआयएल गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची इचलकरंजी शहर तसेच परिसरामध्ये स्वच्छ आणि हरित पर्यावरणपूरक इंधन वितरण करण्यासाठी स्थापना केली आहे. 

कंपनीची मुख्य गॅस वाहिनी दाभोळ येथून येत असून, दक्षिणेमध्ये जाते. पेठवडगाव येथे वितरण केंद्र असून, हातकणंगलेमार्गे इचलकरंजी शहरात लवकरच मुख्य वाहिनी टाकली जाणार आहे. इचलकरंजी शहरातील प्रशासकीय वॉर्ड क्रमांक 5, 7, 2, 11, 16, 18 आणि 20 मध्ये पहिल्या टप्प्यात गॅस जोडणी घरोघरी देण्यात येणार आहे. सध्या कंपनी 618 रुपये डिपॉझिट भरून घेऊन गॅस जोडणीसाठी फॉर्म भरून घेत आहेत. येत्या मार्च ते एप्रिल या कालावधीत प्रत्यक्ष गॅसपुरवठ्याला सुरवात होईल. याबाबत कंपनीने विहित खोदाई शुल्क साडेचार कोटी नगरपालिकेकडे भरलेले आहे. 

सिलिंडरपेक्षा स्वस्तात गॅस 
सध्या वापरला जाणारा घरगुती सिलिंडर 14.2 किलो असतो. त्यापैकी काही गॅस द्रव स्वरूपात असतो. बराच गॅस वापरा दरम्यान वाया जातो. त्या तुलनेत पाईपमधून येणारा गॅस बराच परवडतो. एका सिलिंडर इतका गॅस पाईपमधून वापरण्याचा खर्च केवळ 440 रुपये येईल. 

सुलभ जोडणी 
कनेक्‍शन खर्च 6118 रुपये असून, एकत्रितरीत्या अथवा हप्त्याने शुल्क भरता येते. त्यापैकी नोंदणी खर्च 118 रुपये असून तो विना परतावा आहे. 500 रुपये डिपॉझिट आहे.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com