ब्रेकिंग; गोकुळचं बिगुल वाजलं, निवडणूक कार्यक्रम जाहीर

gokul election date declared in kolhapur voting for 2 may
gokul election date declared in kolhapur voting for 2 may

कोल्हापूर : जिल्ह्याचे राज्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान होत आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने या कार्यक्रमाची आज घोषणा केली. कालच (22) हा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी प्राधिकरणाकडे पाठवला होता. गुरूवारपासून (25) या निवडणुकीसाठीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. 

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने प्रशासकीय पातळीबरोबर राजकीय हालचालींना वेग आला आहे. कालच (22) विरोधी शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे तर सत्तारूढ गटाने वैयक्तीक गाठीभेटीवर भर दिला आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 'गोकुळ' ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील अंतिम मतदार यादीचा महत्त्वाचा टप्पा 12 मार्च रोजी पूर्ण झाला. त्यानंतर या निवडणुकीसाठी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नावडकर यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर निवडणूक कार्यक्रमाचा आराखडा तयार केला होता. काल ( 22) हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सहकार प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. प्राधिकरणाने आज या कार्यक्रमाला मंजुरी दिली. 

 गुरूवारपासून (25) या निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज भरण्यापासून ते अर्ज माघारीची प्रक्रिया नावडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कार्यालयात होणार आहे. मतदान आणि मतमोजणीचे ठिकाण अद्याप निश्‍चित झाले नसून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर या दोन्ही जागांचा शोध घेण्यात येणार आहे. गेल्यावर्षी या निवडणुकीचे मतदान सेंट झेव्हीयर्स हायस्कूल येथे तर मतमोजणी सिंचन भवन परिसरातील बॅडमिंटन हॉलमध्ये झाली होती. 

निवडणूक कार्यक्रम असा 

  • 25 माचे ते 1 एप्रिल - उमेदवारी अर्ज भरणे 
  • 5 एप्रिल - उमेदवारी अर्जाची छाननी 
  • 6 एप्रिल - वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द 
  • 6 ते 20 एप्रिल - उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी 
  • 22 एप्रिल - उमेदवारांना चिन्हांचे वाटप 
  • 2 मे - मतदान 
  • 4 मे - मतमोजणी 

दृष्टीक्षेपात गोकुळ निवडणूक 

  • एकूण पात्र संस्था - 3656 
  • संचालक पदाच्या जागा - 21 (सर्वसाधारण गट - 16, महिला प्रतिनिधी- 2, ओबीसी, अनुसुचित जाती, भटक्‍या विमुक्त प्रत्येकी एक जागा) 
  • कार्यक्षेत्र - कोल्हापूर जिल्हा 
  • दैनंदिन संकलन - सुमारे 15 लाख लिटर 

पॅनेलची घोषणा शेवटच्या दिवशीच 

या निवडणुकीत सत्तारूढ व विरोधी अशी दोन पॅनेल होणार आहेत. दोन्हीकडे मातब्बर उमेदवार इच्छुक आहेत. विद्यमान सहा संचालकांनी सत्तारूढ गटाला हादरा देत विरोधी आघाडीकडे जाणे पसंत केल्याने दोन्ही पॅनेलमध्ये उमेदवार कोण असणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. तथापि शेवटच्या क्षणी तगडा उमेदवार विरोधकांच्या हाती लागू नये यासाठी दोन्ही पॅनेलकडून उमेदवारांची घोषणा ही अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com