'गोकुळश्री' पुरस्कार उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठीच : रवींद्र आपटे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

पहिल्या तीन विजेत्यांनाअनुक्रमे 25, 20 व 15 हजार रुपये रोख देऊन गौरवण्यात आले. 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देण्याऱ्या गायी-म्हशींसाठी दिल्या जाणाऱ्या "गोकुळश्री' स्पर्धेत शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील सीताराम शंकर पाटील यांच्या म्हशीला तर माणगांव (ता. हातकणंगले) येथील अनिल पारीसा मगदूम यांच्या गायीला प्रथम क्रमांक मिळाला. "गोकुळ'च्या कार्यालयात उत्पादकांचा सत्कार संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या हस्ते झाला. पहिल्या तीन विजेत्यांनाअनुक्रमे 25, 20 व 15 हजार रुपये रोख देऊन गौरवण्यात आले. 

हेही वाचा - सीईओ साहेब, तर मला सगळंच  बाहेर काढावे लागेल ; राजू शेट्टींचा इशारा

स्वागत व प्रास्ताविक माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केले. संघास जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्था व उत्तम प्रतीचे दूध पुरवठा करणाऱ्या संस्थाचाही सत्कार केला. जिल्हास्तरावर जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्था हनुमान-वडकशिवाले (ता. करवीर) यांनी दररोज सरासरी 4 हजार 302 लिटर, उदय-पोर्ले (ता. पन्हाळा) या संस्थेने तीन हजार 840 लिटर तर श्री राम- चुये (ता. करवीर) संस्थेने तीन हजार 210 लिटर सरासरी दूधाचा पुरवठा केला आहे. 

ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, उदय पाटील, सत्यजित पाटील, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर, शशिकांत पाटील- चुयेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, संस्था प्रतिनिधी, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

हेही वाचा - Covid Update : कोल्हापुरात २१० जणांनी केली कोरोनावर मात

सविस्तर निकाल खालीलप्रमाणे 

म्हैस गट 
स्पर्धकाचे नांव संस्थेचे नांव दररोजचे दूध (लिटरमध्ये) क्रमांक - 
*सीताराम पाटील शाहू छत्रपती-शिरोली दुमाला 18.860 प्रथम 
*श्रद्धा साबळे गोवर्धन-कसबा तारळे 16.890 द्वितीय 
*विजय दळवी कामधेनू-लिंगनूर (गडहिंग्लज) 16.810 तृत्तीय 

गाय गट 
अमोल मगदून माणगांव (हातकणंगले) 35.710 प्रथम 
शांताराम साठे किसनराव मोरे- सरवडे 31.420 द्वितीय 
तानाजी पाटील यशोधन- कसबा सांगाव 30.920 तृत्तीय 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gokul shree award distributed to winners today with the chairperson ravindra apte in kolhapur